Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

फायनलमधला सूर्याचा कॅच आठवतोय? आता फील्डर्स करू शकणार नाहीत असे कारनामे, ICC ने बदलला नियम

ICC New Rules About Catch :  मेरिलबोन क्रिकेट क्लबने बाउंड्री लाईनवर रिले कॅचशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. 

फायनलमधला सूर्याचा कॅच आठवतोय? आता फील्डर्स करू शकणार नाहीत असे कारनामे, ICC ने बदलला नियम

ICC New Rules About Catch : क्रिकेटच्या मैदानावर बाउंड्री लाईनवर फिल्डर्सकडून घेण्यात येणारे कॅच प्रेक्षकांना नेहमीच रोमांचित करत असतात. काही रोमांचक कॅच तर क्रिकेटच्या इतिहासात अमर होतात. असाच एकी जबरदस्त कॅच सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सुद्धा वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये घेतला होता, जो भारताच्या विजयाचा टर्निंग पॉईंट ठरला. परंतु आता मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने बाउंड्री लाईनवर रिले कॅचशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. 

क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल :

आधी फिल्डिंग करत असलेला खेळाडू हवेत असताना बाउंड्रीच्या बाहेर जाऊन अनेकदा बॉलला स्पर्श करू शकत होता, मात्र असं करताना त्याचा पाय जमिनीवर लावू नये असा नियम होता. त्यानंतर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये फिल्डर परत येऊन तो कॅच पूर्ण करू शकत होता. परंतु आता नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. बिग बॅश लीग 2023-24 मध्ये एक कॅच घेत असताना माइकल नेसरने बाउंड्रीच्या बाहेर हवेत बॉलला दोन वेळा मारून तो कॅच पुन्हा फिल्डमध्ये ढकलून तो कॅच पकडला होता. त्यानंतर फलंदाजाला आउट देण्यात आलं, परंतु या निर्णयावर खूप वाद झाला आणि त्यावर टीका झाली. त्यानंतर अशा कॅचशी निगडित नियमांमध्ये बदल करण्यात यावेत अशी आवश्यकता जाणवू लागल्याने क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा : 'शुभमनकडे कॅप्टन्सी फेकली गेली'; योगराज सिंग यांचा विराट, रोहितला टोला, म्हणाले, 'तुम्ही 5 वर्ष....'

 

नियमांमध्ये कसे झाले बदल? 

MCC च्या नवीन नियमांनुसार, आता कोणताही फिल्डर बाउंड्रीच्या बाहेर असताना बॉलला फक्त एकदाच स्पर्श करू शकतो. कॅच घेण्यासाठी फिल्डरला योग्य प्रकारे पहिले मैदानाच्या आत यावे लागेल. नवीन नियम अशा कॅचला सुद्धा योग्य मानतो ज्यात फिल्डर्स पहिले बाउंड्रीच्या आत बॉल पकडतो, आणि मग थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन पुन्हा आत येऊन त्याचा कॅच पूर्ण करतो. परंतु जर बॉलला पकडताना फिल्डर बाउंड्रीच्या बाहेर आहे तर तो कॅच तेव्हाच मान्य होईल जेव्हा फिल्डर पुन्हा मैदानात येऊन तो कॅच पूर्ण करेल. 

रिले कॅचमध्ये सुद्धा झाले बदल?

रिले कॅचच्या नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत. रिले कॅचमध्ये जेव्हा कोणताही फील्डर बाहेर जातो किंवा त्याचा तोल जातो, तेव्हा तो बॉल त्याच्या जवळील फिल्डरकडे फेकतो. नव्या नियमानुसार बॉल फेकणारा खेळाडू हा बाउंड्रीच्या आत असला पाहिजे, आणि कॅच घेणारा फिल्डर सुद्धा कॅच घेताना पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये असला पाहिजे. जर मदत करणारा फिल्डर बाउंड्रीच्या बाहेर आहे तर बॉलला बाऊंड्री मानली जाईल. 

Read More