Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Champions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना

ICC Champions Trophy 2025 Full Schedule: नुकतेच ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे. त्यासोबतच भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार हे देखील समोर आलं आहे. 

Champions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना

ICC Champions Trophy 2025 Full Schedule: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलसाठी यूएईची निवड केली होती. त्यामुळे भारतीय संघ आपले सर्व सामने यूएईमध्ये खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना लाहोरमध्ये खेळला जाणार आहे. पण जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामना दुबईत खेळला जाईल.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना हा पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 19 फेब्रुवारीला कराचीमध्ये होणार आहे. त्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना झाल्यानंतर 20 फेब्रुवारीला होणार आहे. तर अफगाणिस्तानचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना देखील कराचीमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे. 

 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 8 संघांमध्ये एकूण 15 सामने होणार आहेत. सर्व संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. तर भारत आणि पाकिस्तान एकाच गट अ मध्ये असणार आहेत. त्यासोबतच दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड या संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. हे सर्व सामने दिवस-रात्र असणार आहेत. 

सर्व संघांची दोन गटात विभागणी

अ गट- पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश 
ब गट- दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वेळापत्रक -

19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची

20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई 

21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई 

24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी 

26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर

27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची

2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई 

 अंतिम आणि उपांत्य फेरीचे सामने -

4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई
 
5 मार्च – उपांत्य फेरी 2, लाहोर

9 मार्च – अंतिम सामना, लाहोर/ दुबई

Read More