Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

' भारतात येऊ नकोस...', चॅम्पिअन्स ट्रॉफी विजेत्या संघातील खेळाडूला फोनवरून धमकी; स्वत: केला धक्कादायक खुलासा

Threat Calls to Cricketer: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या शानदार विजयानंतर टीम इंडियाच्या एका खेळाडूने धक्कादायक खुलासा केला आहे. या खेळाडूने सांगितले की त्याला फोनवर भारतात परत न येण्याच्या धमक्या आल्या होत्या. एवढेच नाही तर लोकांनी या खेळाडूचा पाठलागही केला.  

' भारतात येऊ नकोस...', चॅम्पिअन्स ट्रॉफी विजेत्या संघातील खेळाडूला फोनवरून धमकी; स्वत: केला धक्कादायक खुलासा

Champions Trophy Plyer got  received threat calls: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. एकही सामना न गमवण्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना हे यश मिळवता आलं. भारतीय  खेळाडू ट्रॉफी जिंकून भारतात परतले आहेत. आता टीम इंडियाचे हे खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. दरम्यान, या स्टार खेळाडूंच्या टीममधून एका भारतीय खेळाडूने धक्कादायक खुलासा केला आहे. या खेळाडूला जीवे मारण्याची धमकी आली होती. खरंतर, हा खेळाडू 2021 च्या T20 विश्वचषकात टीम इंडियाचा भाग होता. या खेळाडूसाठी ही स्पर्धा खूपच वाईट ठरली होती. या स्पर्धेनंतर या खेळाडूला  फोनवर भारतात परत न येण्याच्या धमक्या आल्या. एवढेच नाही तर लोकांनी या खेळाडूचा पाठलागही केला.

कोण आहे भारतीय खेळाडू?

खरतर, स्पिनर वरुण चक्रवर्ती ( Varun chakravarthy ) 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचा खलनायक ठरला होता. टीम इंडिया तेव्हा ग्रुप स्टेजमधूनच स्पर्धेतून बाहेर पडला होती. या काळात वरुण चक्रवर्तीला 3 सामन्यात एकही विकेट घेता आली न्हवती जे भारतीय संघाला फार महागात पडले होते. यानंतर वरुणला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. जवळपास 3 वर्षे तो टीम इंडियात आपले स्थान निर्माण करून पुर्णरागमन करू शकला न्हवता. यानंतर, त्याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत पुनरागमन केले आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये केवळ 3 सामन्यात 9 विकेट घेतल्या. तो या स्पर्धेतील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता.

हे ही वाचा: होळीच्या दिवशी क्रिकेट जगतावर शोककळा, 'या' स्टार खेळाडूच्या मुलीचा झाला मृत्यू; वय अवघे दोन वर्ष

वरुण चक्रवर्ती स्वतः सांगितलं किस्सा 

2021 च्या T20 वर्ल्ड कपबद्दल बोलताना वरुण चक्रवर्ती लोकप्रिय अँकर गोबीनाथच्या यूट्यूब शोमध्ये म्हणाला की, "माझ्यासाठी हा खूप वाईट काळ होता. मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो. विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर त्या निवडीला मी न्याय देऊ शकलो नाही, असे मला वाटले. मला एकही विकेट घेता आली नाही याचे दु:ख होते. त्यानंतर तीन वर्षे माझी टीम इंडियात निवड झाली नाही. त्यामुळे पदार्पणापेक्षा पुनरागमनाचा मार्ग माझ्यासाठी कठीण होता. २०२१ च्या विश्वचषकानंतर मला धमकीचे फोन आले. भारतात येऊ नकोस असे कॉलवर सांगण्यात आले. तू परत यायचे प्रयत्न केल्यास तुम्ही परतू शकणार नाही. माझ्या घरी लोक यायचे. माझ्या मागे लागायचे, पाठलाग करायचे.  मला लपावे लागले. जेव्हा मी विमानतळावरून परतत होतो, तेव्हा काही लोक बाइकवरून माझ्या मागे येत होते. पण जेव्हा मी त्या गोष्टी आठवतो आणि मला आता मिळत असलेली प्रशंसा बघतो, तेव्हा मला आनंद होतो." 

हे ही वाचा: 'हा' आहे एकाच कसोटी सामन्यात हॅटट्रिक आणि शतक झळकावणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू

 

 

 

हे ही वाचा: 'भारतीय खेळाडू इतर लीगमध्ये...' इंझमाम उल हक पुन्हा एकदा बरळला; सर्व देशांना केलं जाहीर आवाहन

 

टीम इंडियात परतण्यासाठी घेतली खूप मेहनत 

पुनरागमनाबद्दल बोलताना वरुण चक्रवर्ती म्हणाला, "२०२१ नंतर मी स्वतःमध्ये खूप बदल केले. मला माझी लाइफस्टाइल बदलावी लागली. मी एका सत्रात ५० चेंडूंचा सराव करायचो. निवडकर्ते मला बोलवतील की नाही याचा विचार करून मी सरावाचे टार्गेट दुप्पट केले. तिसऱ्या वर्षानंतर मला वाटले की सर्व काही संपले आहे. पण आम्ही आयपीएल जिंकलो आणि नंतर त्यांनी मला बोलावले, त्यानंतर मी खूप आनंदी होतो." 

Read More