Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

नव्या नियमाने खेळला जाणार टेस्ट क्रिकेट, 'या' चुकीबद्दल फील्डिंग करणाऱ्या संघाला बसणार दंड

ICC Rules Change in Test Cricket: नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने षटक संपल्यानंतर एका मिनिटाच्या आत पुढचे षटक सुरू करण्यास तयार असले पाहिजे. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना पंचांकडून दोन वेळा इशारा दिला जाईल.  

नव्या नियमाने खेळला जाणार टेस्ट क्रिकेट, 'या' चुकीबद्दल फील्डिंग करणाऱ्या संघाला बसणार दंड

ICC New Rules in Test Cricket: क्रिकेटचं विश्व सतत बदलत असतं आणि हे बदल खेळ आणखी रोचक बनवतात. अनेक नियम वेळेनुसार, खेळाडूंच्या वागणुकिणीसार  नवीन नियम आणणे आवश्यक असते. अशाच एका नव्या बदलाचा अनुभव आता टेस्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार आहे. आयसीसीने टेस्ट मॅचेसमध्येही 'स्टॉप क्लॉक' नियम लागू केला आहे. हा नियम वनडे आणि टी-20 मॅचमध्ये आधीपासूनच आहे, पण आता तो टेस्ट क्रिकेटमध्येही लागू करण्यात आला आहे.

काय आहे हा नियम?

नव्या नियमानुसार, फील्डिंग करणाऱ्या संघाने एका ओव्हरच्या शेवटीनंतर एक मिनिटाच्या आत पुढचा ओव्हर सुरू करण्यासाठी तयार असायला हवं. जर संघ वेळेत तयार नसला, तर अंपायर त्या टीमला दोन वेळा वॉर्निंग देतील.

दोन वेळा वॉर्निंग, नंतर थेट 5 रनचा दंड!

जर दोन वेळा वॉर्निंग दिल्यानंतरही संघ वेळेचा आदर करत नसेल, वेळेत पुढील ओव्हर सुरु करत नसेल तर त्याला दंड बसणार. हा दंड साधासुधा नसून थेट 5 रनची पेनल्टी फील्डिंग टीमवर लावली जाईल. याचा अर्थ असा की फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात पाच अतिरिक्त धावा जमा होतील.

80 ओव्हरपर्यंत नियम लागू, मग होईल रिसेट

हा नियम 80 ओव्हरपर्यंत लागू राहणार असून त्यानंतर वॉर्निंग्स रिसेट केल्या जातील. याचाच अर्थ असा की पुन्हा नव्यानं वॉर्निंग दिल्या जातील.

ताजे उदाहरण... 

या प्रकरणाचे ताजे उदाहरण म्हणजे इंडिया वि. इंग्लंड टेस्ट मॅचमध्ये अंपायर्सनी बेन स्टोक्स आणि शुभमन गिलला वेळेच्या बाबतीत वॉर्निंग दिली होती.

कधीपासून आला नियम?

हा नियम आता अधिकृतपणे 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) पासून लागू करण्यात आलेला आहे.

Read More