मुंबई : आयसीसीने टी 20 रँकिंग (Icc T20 Ranking) जाहीर केली आहे. या टी 20 रँकिगने भारतीय खेळाडूंसह (Indian Cricket Team) क्रिकेट चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. क्रिकेट चाहते गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला. टीम इंडियाच्या आक्रमक आणि युवा फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Pakistan Babar Azam) पछाडत वरचा क्रमांक पटकावलाय. (icc t20i ranking team india batter sky aka suryakumar yadav surpassed to pakistan captain babar azam and get 3rd position in batsman ranking)
Star Indian batter closes in on the top spot in the @MRFWorldwide ICC Men's Player T20I Rankings for batters
— ICC (@ICC) September 21, 2022
Details https://t.co/pdcD6jfjkN
बाबर आणि सूर्यकुमार यांच्यात गेल्या 3-4 रँकिंगपासून चढाओढ पहायला मिळत होती. दोघांमध्ये अवघ्या काही रेटिंग्स पॉइंट्सचं अंतर होतं. मात्र सूर्यकुमारने यावेळेस डाव साधत बाबरला मागे टाकलंच. सूर्यकुमारला ताज्या रँकिंगमध्ये एका स्थानाचा फायदा झालाय. तर दुसऱ्या बाजूला बाबरला तेवढ्याच म्हणजेच एका स्थानाने घसरण झालीय. दोघांच्या रेटिंग्स पॉइंट्समध्ये 9 चा फरक आहे. सूर्याच्या नावे 780 तर बाबरच्या नावे 771 पॉइंट्स आहेत.