Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ICC कसोटी रँकिंगमध्ये भारताची तिसऱ्या स्थानावर घरसण, ही टीम अव्वल

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking ) टीम इंडियाची पहिल्या क्रमांकावरुन घसरण झाली आहे.  

ICC कसोटी रँकिंगमध्ये भारताची तिसऱ्या स्थानावर घरसण, ही टीम अव्वल

मुंबई : आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking ) टीम इंडियाची पहिल्या क्रमांकावरुन घसरण झाली आहे. भारत तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले आहे. विराट सेनेवर ही मोठे नामुष्की ओढवली आहे.

आयसीसीच्या रँकिंगच्या सध्याच्या अद्ययावत माहितीनुसार, मे २०१९ नंतर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांची मोजणी १०० टक्के आणि त्यापूर्वीच्या दोन वर्षांतील कसोटी सामने ५० टक्के आहेत. आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघदेखील कसोटी आणि टी -२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. टी -२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने प्रथम स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. वनडे क्रमवारीत इंग्लिश क्रिकेट संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचे आता ११६ गुण आहेत, न्यूझीलंड ११५ गुणांसह दुसर्‍या आणि टीम इंडिया ११४ गुणांसह कसोटी क्रमवारीत तिसर्‍या स्थानावर आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया अजूनही अव्वल स्थानी आहे. ही टीम इंडियासाठी दिलासा देणारी बाब आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपमध्ये एकूण ९ संघ सहभागी आहेत. यामध्ये सर्व संघ ६ कसोटी मालिका खेळतील आणि त्यानंतर अंतिम कसोटी सामना पॉईंट टेबलच्या आधारे टॉप -२ संघांमधील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाईल. २०११६-१७ च्या हंगामात भारताने १२ कसोटी सामने जिंकले, तर एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Read More