Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आयसीसी क्रमवारी : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी झेप

टीम इंडियाला न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेमध्ये व्हॉईट वॉश मिळाला. 

आयसीसी क्रमवारी : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानी झेप

मुंबई : टीम इंडियाला न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेमध्ये व्हॉईट वॉश मिळाला. संपूर्ण कसोटी मालिकेमध्ये टीम इंडिया पूर्णत: अपयशी ठरली. या विजयामुळे न्यूझीलंड क्रिकेट संघाने आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर टीम इंडियासाठी हा पराभव म्हणजे धोक्याची घंटा ठरली आहे. 

न्यूझीलंडविरुद्धच्या  कसोटी मालिकेमध्ये टीम इंडियाला व्हाईट वॉशला सामोरं जावे लागल्याने टीका होत आहे. संपूर्ण कसोटी मालिकेमध्ये भारतीय बॅट्समननी अतिशय खराब कामगिरी केली. किवींच्या तेज माऱ्यासमोर भारतीय बॅट्समन संघर्ष करतानाच दिसले. ट्रेन्ट बोल्ट, टीम साऊदी, कायले जॅमिसनने टीम इंडियाचे कच्चे दुवे दाखवून दिले. टीम इंडियाची ज्याच्यावर भिस्त असते असा कर्णधार विराट कोहलीही संपूर्ण  कसोटी मालिकेमध्ये हतबल असल्याचे पाहायला मिळाला. 

अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल किवींच्या वेगवान माऱ्याचा मुकाबलाच करु शकले नाहीत. न्यूझीलंडनं टी-२० सीरिजमधील पराभवाचा पुरेपूर वचपा काढला.. सुरुवातीला एक दिवसीय मालिकेतमध्ये टीम इंडियाला ३-० नं व्हाईट वॉश दिला तर टेस्ट सीरिजमध्ये २-०नं भारताचा धुव्वा उडवला. कसोटी मालिकेमध्ये भारतानं न्यूझीलंडसमोर पार खच खाल्ली. एकंदर टीम इंडियाच्या कामगिरीवर नजर टाकली तर आगामी मालकांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.. 

सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया ११६ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडने ११० गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली असून ऑस्ट्रेलिया १०८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. या संपूर्ण दौऱ्यामध्ये टीम इंडियाच्या कमकुवत बाजू उघड झाल्या. भारतात शेर असणारे आपले खेळाडू न्यूझीलंडमध्ये पूर्णपणे ढेर झाल्याचंच पाहायला मिळाले. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली प्रथमच भारताला कसोटी मालिकेमध्ये व्हॉईट वॉश मिळाला. यामुळे विराट सेना सावधान हा पराभव केवळ पराभव नाहीय तर ही धोक्याची घंटा आहे.

Read More