Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

T20 वर्ल्ड कपमध्ये 'या' दिवशी भिडणार भारत - पाकिस्तान, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

ICC Womens T20 World Cup 2026 : भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर येतात तेव्हा सर्व क्रिकेट विश्वाचं लक्ष या सामन्याकडे असतं. तेव्हा पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या क्रिकेट टीममध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेज सामना खेळवण्यात येणार आहे. 

T20 वर्ल्ड कपमध्ये 'या' दिवशी भिडणार भारत - पाकिस्तान, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

ICC Womens T20 World Cup 2026 : भारत आणि पाकिस्तान हे देश सख्खे शेजारी असले तरी या दोन्ही देशांचे संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर येतात तेव्हा सर्व क्रिकेट विश्वाचं लक्ष या सामन्याकडे असतं. तेव्हा पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan) या दोन्ही संघांच्या क्रिकेट टीममध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेज सामना खेळवण्यात येणार आहे. इंग्लंड आणि  वेल्स क्रिकेट बोर्ड हे संयुक्तपणे आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 चं (ICC Women's T20 World Cup 2026) आयोजन करणार असून याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 

12 जून पासून होणार T20 वर्ल्ड कपला सुरुवात : 

आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 12 जून पासून होणार असून या स्पर्धेत एकूण 33 सामने खेळवले जातील. 12 जून रोजी स्पर्धेचा पहिला सामना हा इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होईल. यंदा या वर्ल्ड कपमध्ये एकूण 12 संघ सहभागी होतील. 12 संघांना 6-6 च्या ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून भारत या वर्ल्ड कपमध्ये एकूण 5 लीग स्टेज सामने खेळले. 

'या' दिवशी होणार भारत - पाक सामना : 

भारतीय संघ आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 चा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 14 जून रोजी खेळेल. इंग्लंडच्या एजबॅस्टन स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येईल. रविवार 14 जून रोजी सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. काही दिवसांपूर्वीच आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 च्या वेळापत्रकाची सुद्धा घोषणा झाली होती. यावेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. हा सामना श्रीलंकेच्या कोलंबो शहरात होणार असून दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. 

ग्रुप ए मध्ये भारताचा समावेश : 

 महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 12 संघांना 6-6 च्या ग्रुपमध्ये विभागण्यात आले असून यातील ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया सह अन्य दोन क्वालिफाय करणाऱ्या संघांचा समावेश होईल. तर ग्रुप बीमध्ये इंग्लंड वेस्टइंडीज, न्यूझीलंड, श्रीलंका सह अन्य दोन क्वालिफाय करणाऱ्या संघांचा समावेश होईल. हा वर्ल्ड कप एकूण 6 मैदानांवर खेळवला जाईल ही मैदान लॉर्ड्स, द ओवल, एजबेसटन, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड आणि हॅम्पशायर बॉल अशी आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 3, संध्याकाळी 7 आणि रात्री 11 वाजता या सामन्यांना सुरुवात होईल. आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 चे सेमी फायनल सामने 30 जून आणि 2 जुलै रोजी होतील. तर रविवार 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर फायनल सामना खेळवला जाईल. 

Read More