Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

"मी PM असतो तर, देशाबाहेर हाकलून दिले असते…" योगराज सिंह कोणावर संतापले?

Yograj singh: एका भारतीय खेळाडूवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी खूप संताप व्यक्त केला आहे.   

Yograj Singh on Rohit Sharma Controversy: काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्माला जाड आहे असे बोलल्या आणि यानंतर एकच गदारोळ झाला. बीसीसीआयपासून ते प्रत्येक क्रिकेट चाहत्याने काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. हे प्रकरण काही वेळातच एवढंच प्रकरण वाढल्यावर काँग्रेसनेही आपल्या प्रवक्त्यावर कारवाई करत तिला ट्विट डिलीट करण्याचे आदेश दिले. आता याप्रकरणी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

रोहितवर केलेल्या कमेंटमुळे योगराज संतापले

काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांच्यावर टीका करत योगराज सिंह बोलले की, " मला एवढेच म्हणायचे आहे की, जर कोणी त्याच्या कामाची जबाबदारी घेत असेल तर त्याने काठी वाजवावी. भारतीय क्रिकेटपटू, तेथील लोक आणि ही भूमी मला माझ्या जीवापेक्षा प्रिय आहे. आपल्या देशाची शान आणि अभिमान असलेल्या खेळाडूबद्दल कोणताही राजकारणी वक्तव्य करत असेल तर त्याला त्याच्या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे." पुढे योगराज सिंह म्हणाले की, "याप्रकरणी कारवाई करावी. हे सर्व खपवून घेतले जाणार नाही. जर मी पंतप्रधान असतो तर मी तुम्हाला बॅग भरून देश सोडण्यास सांगितले असते." 

हे ही वाचा: IND vs AUS Semi-Final: उपांत्य फेरीत पाऊस पडला तर काय होईल? 'या' संघाला मिळेल अंतिम फेरीत प्रवेश

 

काय म्हणाले काँग्रेसच्या प्रवक्त्या? 

" मला रोहित शर्माला कर्णधार म्हणून आवडत नाही आणि एक खेळाडू म्हणून तो लठ्ठ आहे" असे काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद बोलल्या होत्या. त्यांच्या या विधानावरुन जोरदार वाद सुरु आहे. खुद्द काँग्रेस पक्षानेच त्यांच्यावर कारवाई केली. काँग्रेस पक्षाने शमा यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले. नंतर काँग्रेस प्रवक्त्याने स्पष्ट केले की तिने रोहित शर्माची तुलना भारताच्या माजी दिग्गज कर्णधारांशी केली होती.

हे ही वाचा: भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामन्यापूर्वी आली वाईट बातमी, 'या' दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

 

रोहित शर्माची कामगिरी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. भारताचा सामना ४ मार्चला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा हा सामना होणार आहे. हा सामना दुबईत होणार असून येथे टीम इंडियाने तिन्ही सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानमध्ये खेळले आहेत आणि उपांत्य फेरीचा सामना हा दुबईतील पहिला सामना असेल.

Read More