Pahalgam Attack : 21 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात दहशतवाद्यांनी 28 निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर भारतात असंतोष पसरला. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं सूत्रांच्या माहितीमधून समोर आलं. त्यानंतर भारताचे पाकिस्तानवर अनेक निर्बंध घातले तसेच अनेक सामंजस्य करार देखील स्थगित केले. यादरम्यान पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. यापूर्वी देखील भारताविरोधात शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) अशी वक्तव्य केली आहेत. मात्र शाहिद आफ्रिदी भारताचा इतका द्वेष का करतो याची काही कारण समोर आली आहेत.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यानंतर एक वादग्रस्त वक्तव्य केलं त्याने पहलगाम हल्ल्यासाठी भारतीय सेनेला जबाबदार धरलं, तसेच त्याने भारतीय सैन्य दलाला 'बेकार' सुद्धा म्हटले. त्याने भारतावर आरोप लावले की, 'दहशतवादी एक तास पहलगाममध्ये लोकांची हत्या करत होते आणि 8 लाखपैकी एक सैनिक सुद्धा त्यांच्या मदतीसाठी आले नाहीत, पण जेव्हा ते आले, तेव्हा त्यांनी पाकिस्तानला दोषी ठरवलं. भारत स्वतःदहशतवाद करतो, आपल्याच लोकांना मारतो आणि मग पाकिस्तानवर आरोप लावतो. पाकिस्तान कधीही अशा कामांचं समर्थन करत नाही. आम्ही नेहमीच भारतासोबत आमचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी हा भारताचा इतका द्वेष का करतो याचं कारण 22 वर्षांपूर्वीची एक घटना आहे. 2003 मध्ये शाकिब नावाच्या दहशतवाद्यावर भारताच्या बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) ने गोळीबार केला होता. यात मारला गेलेला शाकिब हा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा चुलत भाऊ होता. भावाची भारतीय सैनिकांनी हत्या केली त्यापासून तो भारताचा विशेष राग करतो असे समोर आले आहे.
हेही वाचा : मॅचपूर्वी कोणी केला हार्दिक पंड्यावर हल्ला? डोळ्यांजवळ झाली दुखापत, पडले 7 टाके
शाहिद अफरीदीचा चुलत भाऊ शाकिब हा 7 डिसेंबर 2003 रोजी बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) सोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. भारताच्या बॉर्डर सिक्योरिटी फोर्सने शाकिब याला हरकत-उल-अंसारचा बटालियन कमांडर असल्याचे सांगितले होते. शाहिद अफरीदीचा भाऊ शाकिब हा जागतिक दहशतवादी हाफिज सईदच्या संपर्कात होता. शाकिबकडून मिळालेल्या काही कागदपत्र आणि दस्तऐवजीतून तो पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा भाऊ असल्याचे स्पष्ट होत असल्याची माहिती त्यावेळी बॉर्डर सिक्योरिटी फोर्सने दिली होती.
शाकिब पेशावरचा राहणार होता आणि त्याची हत्या होण्याच्या दीड वर्षांपर्यंत ती अनंतनाग भागात ऍक्टिव्ह होता. शाहिद अफरीदी वर्ष 2003 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा भाग होता. तेव्हा शाहिद अफरीदीने शाकिब हा त्याचा भाऊ नाही अशी माहिती दिली होती. शाहिद अफरीदीच्या हवाल्याने काही वृत्तपत्रांनी माहिती दिली होती की, 'पठाण कुटुंब हे खूप मोठं आहे आणि मी माझ्या अनेक चुलत भावंडांना विसरलोय. त्यामुळे ते काय करतात याबाबत मला जराही कल्पना नाही'.