Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Rohit Sharma : हिटमॅन रोहित शर्माचा भीमपराक्रम, टी 20 क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs AUS 2ND T20) नाबाद 46 धावांची खेळी केली.  

Rohit Sharma : हिटमॅन रोहित शर्माचा भीमपराक्रम, टी 20 क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

नागपूर : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर (IND vs AUS 2ND T20) दुसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) या विजयात निर्णायक भूमिक निभावली. रोहितने सर्वाधिक नाबाद 46 धावांची खेळी केली. रोहितने या खेळीसह टी 20 क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड (World Record)  ब्रेक केला आहे. (ind vs aus 2nd t20 team india rohit sharma break martin guptil most sixes record in short format against australia at nagpur vca)

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड

रोहितने या 46 धावांच्या खेळीत 4 गगनचुंबी सिक्स खेचले. यासह रोहित टी 20 क्रिकेमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा फलंदाज ठरला. रोहितने न्यूझीलंडच्या (New Zealand) मार्टिन गुप्टीलला (Martin Guptill) पछाडलं. आता रोहितच्या नावावर एकूण 176 सिक्सची नोंद झाली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी रोहितला वर्ल्ड रेकॉर्डसाठी अवघ्या 1 सिक्सची गरज होती. तेव्हा सर्वाधिक सिक्सबाबत मार्टिन आणि रोहित संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर होते. मात्र रोहितने दुसऱ्या सामन्यात सिक्स ठोकताच हा पराक्रम केला. 

टी 20 मध्ये सर्वाधिक सिक्स

रोहित शर्मा - 176 

मार्टिन गुप्टिल - 172 

ख्रिस गेल   124

इयोन मॉर्गन - 120 

आरोन फिंच - 117

Read More