Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND VS AUS: तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी; 'या' खेळाडूवर लागली 2 सामन्यांची बंदी

IND VS AUS: एक मोठी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी एका खेळाडूंवर अचानक बॅन लागल्याने एकच खळबळ माजली आहे. 

IND VS AUS: तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी; 'या' खेळाडूवर लागली 2 सामन्यांची बंदी

IND VS AUS: सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. टीम इंडियाने यापूर्वी 2 सामने जिंकून सिरीज आपल्या नावे केली आहे. 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला क्लिन स्विप देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान याचपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी एका खेळाडूंवर अचानक बॅन लागल्याने एकच खळबळ माजली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अचानक आपल्या एका खेळाडूवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. क्रिकेटच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे या खेळाडूवर कारवाई करण्यात आली आहे. 

या खेळाडूवर घातली सामन्यांची बंदी

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मॅथ्यू वेडवर ही एक्शन घेतली आहे. यावेळी 18 महिन्यांत तिसऱ्यांदा आचारसंहिता मोडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तस्मानियाचा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेडवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. मॅथ्यू वेड सध्या मार्श कपमध्ये खेळतोय. या स्पर्धेच्या एका सामन्यादरम्यान मॅथ्यू वेडने रागाच्या भरात त्याच्या पीचवर बॅट आपटली. यामुळे आता त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी लागणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतली एक्शन

एकदिवसीय मार्श कपदरम्यान राग व्यक्त केल्याबद्दल मॅथ्यू वेडला शिक्षा झाली आहे. या स्पर्धेत सोमवारी दुसरा सामना टास्मानिया विरूद्ध व्हिक्टोरिया यांच्यात खेळला गेला. तस्मानियासाठी मॅथ्यू वेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. याच दरम्यान ही घटना घडली आणि वेडने चूक केली. या आरोपाला वेडने विरोध केला नसून त्याने आपली चूक मान्य केलीये. यावेळी त्याला दोषी ठरवण्यात आलं असून त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली.

कसं आहे मॅथ्यू वेडचं इंटरनॅशनल करियर?

ऑस्ट्रेलियाचा एक प्रमुख खेळाडू म्हणून मॅथ्यू वेडचं नाव घेण्यात येतं. 2021 च्या T20 वर्ल्डकपमध्ये त्याने टीमला ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वेडने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 36 टेस्ट, 97 वनडे आणि 75 टी-20 सामने खेळले आहेत.

Read More