Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind vs Aus: स्मिथचं वनडे करिअरमधील सर्वात वेगवान शतक

भारताविरुद्ध वेगवान शतक ठोकणारे फलंदाज कोण? 

Ind vs Aus: स्मिथचं वनडे करिअरमधील सर्वात वेगवान शतक

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर स्टीव्ह स्मिथने वेगवान डाव खेळत टीम इंडियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शतक झळकावले. स्टीव्ह स्मिथच्या वनडे कारकिर्दीतील हे दहावे शतक आहे. आपल्या कारकीर्दीतील 126 व्या वनडे सामन्यात त्याने दहावे शतक झळकावले. भारताविरुद्धचे हे त्याचे चौथे वनडे शतक होते. कर्णधार अॅरोन फिंचनंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्टीव्ह स्मिथनेही शतक झळकावले.

स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 62 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने 62 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. यासाठी त्याने 10 चौकार आणि 4 जबरदस्त सिक्सही ठोकले. या सामन्यात त्याने 66 चेंडूत 105 धावा केल्या. स्मिथच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवल्यानंतर 374 रन केले. स्मिथने केवळ 62 चेंडूंत 100 धावा पूर्ण केल्या आणि हे त्याच्या वन डे कारकीर्दीतील सर्वात वेगवान शतक आहे.

स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक ठोकण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ग्लेन मॅक्सवेलने 51 बॉलमध्ये झळकावले होते तर दुसर्‍या क्रमांकावर जेम्स फॉल्कनरने 57 बॉलमध्ये ही कामगिरी केली होती. स्मिथने 62 बॉलमध्ये त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक झळकावले आहे.

भारताविरुद्ध वेगवान वनडे शतक ठोकणारे फलंदाज

45 बॉल - शाहिद आफ्रिदी

57 बॉल - जेम्स फॉल्कनर

57 बॉल - एबी डिव्हिलियर्स

58 बॉल - एबी डिव्हिलियर्स

62 बॉल - स्टीव्ह स्मिथ

Read More