Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स मोडल्या. मिशन मार्श (Mitchell Marsh) आणि स्टिव स्मिथने (Steven Smith) रोहित शर्माची डोकेदुखी वाढवली होती. मात्र, सिराजने स्मिथची विकेट काढली अन् जोडी फोडली. तापत्या गर्मीमध्ये सामना होत असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागला. अशातच सामन्यातील एक व्हिडीओ (Virat kohli funny Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिशन मार्श आणि स्टिव स्मिथने जोडीने भारतीय गोलंदाजांना भर उन्हात घाम फोडला. 28 व्या ओव्हरमध्ये भारताला दुसरी विकेट मिळाली. 215 धावांवर कांगारूंचा दुसरा खेळाडू बाद झाला. त्यानंतर मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) मैदानात आला. 20 ओव्हर खेळताच स्मिथला भारतातील उन्हाळा सोसला नाही. त्यामुळे त्याने ड्रिंक्स मागवल्या. त्यावेळी विराट कोहली आणि मार्नस लॅबुशेन या दोन अतरंगी खेळाडूंची जोडी जमली. विराटने भन्नाट अॅक्शन करत लॅबुशेनला डिवचायला गेला. त्यावेळी दोघंही हसत बोलताना दिसले.
Virat Kohli - what a character!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2023
He's having fun with Marnus Labuschagne while Steven Smith is chilling in the hot afternoon. pic.twitter.com/CVK8jmTcr3
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाचा संघ : मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड.