Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs BAN : विराट,राहूलच अर्धशतक, बांगलादेश समोर इतक्या धावांचे आव्हान

टीम इंडियाने बांगलादेशला दिलं इतक्या धावांचं लक्ष्य 

IND vs BAN : विराट,राहूलच अर्धशतक, बांगलादेश समोर इतक्या धावांचे आव्हान

पर्थ : बांगलादेश विरूद्धच्या (IND vs BAN) सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट गमावून 184 धावा ठोकल्या आहेत. विराट कोहली (virat kohli) आणि के ल राहूलच्या (kl rahul) अर्धशतकीच्या बळावर टीम इंडियाने ही धावसंख्या गाठली आहे. त्यामुळे आता बांगलादेशसमोर 185 धावांचे आव्हान असणार आहे. आता हा सामना टीम इंडिया जिंकते की बांगलादेश जिंकते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

बांगलादेशने (Bangladesh) टॉस जिंकत प्रथम  फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया (Team India) प्रथम फलंदाजीला उतरली होती. मात्र टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 2 धावावर बाद झाला. तर के एल राहूलची बॅट बांगलादेश विरूद्ध काहीशी तळपली आहे. त्याने 32 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 4 सिक्स आणि 3 फोर मारले आहेत. सुर्यकुमार 30 धावा करू शकला.  हार्दीक पंड्या, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल एकेरी धावसंख्या करून बाद झाले आहेत. अश्विन 13 धावा करून नाबाद राहिला.  

टीम इंडियाकडून विराट कोहलीने (Virat Kohli) एकाकी झूंज दिली आहे. विराटने 44 बॉलमध्ये 64 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 8 फोर आणि 1 सिक्स मारला आहे. या एकाकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 184 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता बांगलादेशसमोर 185 धावांचे आव्हान असणार आहे.

Read More