Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG 1st Test Day 2: जो रूटची तुफान फलंदाजी, भारतीय संघाचे गोलंदाज अपयशी

चेन्नई टेस्टवर इंग्लंडचं वर्चस्व, जो रुट, बेन स्टोकची शानदार फलंदाजी

IND vs ENG 1st Test Day 2: जो रूटची तुफान फलंदाजी, भारतीय संघाचे गोलंदाज अपयशी

चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेमधील पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानात या सुरू आहे. दुसऱ्या दिवशीही इंग्लंडच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आहे. इंग्लंड संघाच्या फलंदाजीसमोर भारतीय संघाचे गोलंदाज अपयशी ठरत असल्याचं दिसत आहे. 

कर्णधार जो रुट आणि बेन स्टोक्सनं इंग्लंड संघाच्य़ा इनिंगला भक्कम स्थितीत नेलं आहे. जो रुटनं दीडशतकी खेळी केली तर बेन स्टोक्सनं हाफ सेंच्युरी खेळी करत रुटला मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे इंग्लंड संघाची ही फलंदाजी भारतीय संघातील गोलंदाजांवर भारी पडताना दिसत आहे. इंग्लंड संघाच्या आतापर्यंत 355 धावा आणि 3 गडी बाद झाले आहेत.

दुसरीकडे भारतीय संघासमोर इंग्लंडला हरवण्याचं आता तगडं आव्हान समोर आहे. जो रूटची विकेट घेण्यासाठी गोलंदाजांचे प्रयत्न सुरू आहे. कोणाला यश मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कर्णधार जो रूट यांचा हा 100 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे जो रूट आता या सामन्यामध्ये दुहेरी शतकापर्यंत पोहोचणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.  

IND vs ENG 1st Test: 700 वेकेट्स घेणाऱ्या 'या' खेळाडूला भारतीय संघात पुन्हा संधी

दुसर्‍या दिवशी इंग्लंडच्या संघाच्या डावात रूट आणि स्टोक्स शानदार फलंदाजी करत होते. 111 व्या षटकानंतर इंग्लंडची धावसंख्या 3 गडी गमावून 326 धावा आहे. जो रूट (150) आणि बेन स्ट्रोक (40) क्रीजवर आहेत.

चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेरीस यजमान इंग्लंड संघाने 3 गडी राखून 263 धावा केल्या होत्या. आज बेन स्टोक्ससोबत जो रूट तुफान फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना आऊट कऱण्याचं मोठं आव्हान भारतीय संघासमोर सध्या तरी आहे.

Read More