IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. 24 जून रोजी या सामन्याचा शेवटचा दिवस असून टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे आव्हान दिलं होतं. हे आव्हान इंग्लंडने 5 विकेट राखून पूर्ण केलं आणि सीरिजमधील पहिला टेस्ट सामना जिंकला. यासह इंग्लंडने भारत विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली.
भारतीय फलंदाजांनी पहिल्या इनिंगमध्ये 10 विकेट गमावून 471 धावा केल्या. यावेळी शुभमन गिल (147), ऋषभ पंत (134) आणि यशस्वी जयस्वाल (101) यांनी शतक ठोकलं. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा भारताकडून फलंदाजी करताना ऋषभ पंत (118), केएल राहुल (137) या दोघांनी शतकीय कामगिरी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाने १० विकेट गमावून 364 धावा केल्या. यासह इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान देण्यात आलं.
गोलंदाजीच्या पहिल्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 465 धावांवर ऑलआउट केलं. यावेळी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5, प्रसिद्ध कृष्णाने 3, मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या विकेट घेण्यात फारसं यश आलं नाही. खेळाडूंनी फिल्डिंग करताना सुद्धा अनेक चुका केल्या ज्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना जीवदान मिळाले. टीम इंडियाचे गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजाला एक विकेट घेण्यात यश आले.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना : 2 ते 6 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना : 10 ते 14 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना : 23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट