IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली, भारताने टॉस गमावल्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. मात्र यावेळी लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानात खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी कमालीची खेळी करून स्कोअर बोर्डवर तब्बल 471 धावसंख्या केली. त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज मैदानात आले, मात्र यावेळी त्यांच्या स्टार फलंदाजाला जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) फार काळ मैदानात टिकून दिले नाही.
18 वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. भारतीय फलंदाजांनी पहिल्या इनिंगमध्ये 10 विकेट गमावून 471 धावा केल्या. यात शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने शतक ठोकलं तर केएल राहुलने 42 तर जडेजाने 11 धावांची खेळी केली.
इंग्लंडचा संघ भारताची 471 धावांची आघाडी मोडण्यासाठी मैदानात आला खरा मात्र त्याच्या स्टार फलंदाजाला बुमराहने स्वस्तात माघारी धाडले. इंग्लंडच्या फलंदाजीची पहिली इनिंग सुरू झाल्यावर गोलंदाजीची पहिली ओव्हर टाकण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मैदानात आला. यावेळी त्याने टाकलेल्या पहिल्या 5 बॉलमध्ये फलंदाजांनी 4 धावा केल्या, मात्र शेवटच्या बॉलवर बुमराहने जॅक क्रॉलीची विकेट घेतली. क्रॉलीने गुड लेंथ बॉल लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतू स्लिपमध्ये करुण नायरने बॉल हातात झेलला ज्यामुळे जॅक क्रॉली कॅच आउट होऊन इंग्लंडच्या तंबूत परतला. पहिल्याच ओव्हरमध्ये बुमराहने भारताला विकेट मिळवून दिल्याने भारतीय संघाने जल्लोष केला.
हेही वाचा : 'Stupid झालं Superb'; ऋषभ पंतचं शतक पाहून गावसकरांचे सूर बदलले, Video होतोय व्हायरल
Like there was ever a doubt SonySportsNetwork GroundTumharaJeetHamari ENGvIND NayaIndia DhaakadIndia TeamIndia pic.twitter.com/yQT9Zom1j9
— Sony Sports Network (SonySportsNetwk) June 21, 2025
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर