Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG पहिल्या मॅचवर 'महा-संकट', पाऊस बनणार व्हिलन? Weather Report ने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं

IND VS ENG 1st Test Weather Report : 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट सीरिजमधील पहिलासामना होणार असून दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडिया 2007 नंतर इंग्लंड मध्ये अद्याप एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही, त्यामुळे 18 वर्षांचा हा दुष्काळ संपवण्याचा यावेळी टीम इंडिया शुभमन गिलच्या नेतृत्वात प्रयत्न करेल. 

IND vs ENG पहिल्या मॅचवर 'महा-संकट', पाऊस बनणार व्हिलन? Weather Report ने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं

IND VS ENG 1st Test Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात जून पासून 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. ही सीरिज इंग्लंडच्या धरतीवर होणार असून यासाठी संपूर्ण भारतीय संघ आयपीएल संपल्यावर इंग्लंड दौऱ्यावर गेलाय. 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट सीरिजमधील पहिलासामना होणार असून दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडिया 2007 नंतर इंग्लंड मध्ये अद्याप एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नाही, त्यामुळे 18 वर्षांचा हा दुष्काळ संपवण्याचा यावेळी टीम इंडिया शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वात प्रयत्न करेल. मात्र टीम इंडियाच्या (Team India) या ध्येयात पाऊस व्हिलन बनण्याची शक्यता आहे. 

काय सांगतोय हवामानाचा अंदाज?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. एक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार सामन्याचे शेवटचे दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्यूवेदरनुसार शुक्रवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी तापमान साधारण 30 अंश सेल्सियस असेल. पुढच्या दिवशी देखील असंच तापमान असण्याची शक्यता आहे मात्र दक्षिण दिशेपासून 17 किलोमीटर प्रति तास असा हवेचा वेग असेल. रविवारी टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यादिवशी 91% टक्के पाऊस पडू शकतो. तर  54 किलोमीटर प्रति तास असा हवेचा वेग असू शकेल. खरा ट्विस्टहा चौथ्या आणि पाचव्या दिवशी असू शकतो कारण यादिवशी तापमान 21 ते 23 अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकते. 

पाऊस बनणार व्हिलन?

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दोन दिवशी 25 टक्के पावसाची शक्यता आहे. लीड्सचे मुख्य ग्राउंड्समन रिचर्ड रॉबिन्सन यांनी क्रिकइन्फोशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला सीम आणि उसळी असेल पण संभावितपणे विकेट सपाट असेल, ज्यामुळे फलंदाजांना काही मदत मिळू शकते. टीम इंडियाने 1952 मध्ये या मैदानावर त्यांचा पहिला सामना खेळला होता. ज्यात त्यांचा 7 विकेटने पराभव झाला होता. त्यापासून भारताने आतापर्यंत सात सामने खेळवले असून यापैकी फक्त 2 सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळला होता. 

हेही वाचा : T20 वर्ल्ड कपमध्ये 'या' दिवशी भिडणार भारत - पाकिस्तान, पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

 

इंग्लंड टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघ : 

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक : 

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून 
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना  : 2 ते 6 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना  : 10 ते 14 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना  :  23 ते 27 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट 

Read More