IND VS ENG 1st Test : भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) लीड्स येथील हेडिंग्लेमध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात तुफान फटकेबाजी करून दोन्ही इनिंगमध्ये शतक ठोकली. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला विकेटकिपर ठरला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 134 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 118 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतरही पंतला त्याची एक चूक महागात पडली.
भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. सोमवारी 23 जून रोजी या सामन्याच्या चौथ्या दिवशी ICC आचार संहित्याच्या लेव्हल 1 चं उल्लंघन केल्या प्रकरणी ऋषभ पंतवर ही कारवाई करण्यात आली. सामन्यादरम्यान अंपायरच्या एका निर्णयावर आपत्ती घेतल्याने आणि त्याच्या समोर बॉल आपटल्याच्या कारणामुळे पंतवर कारवाई करण्यात आलेली आहे. भारताचा उपकर्णधार आणि विकेटकिपर असलेल्या ऋषभ पंतवर आयसीसी आचार संहितेच्या अनुच्छेद 2.8 चं उल्लंघन केल्याचं आढळून आलं. जे आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शवण्याच्या संदर्भात आहे. यासाठी पंतला एक डिमेरिट पॉइंट सुद्धा मिळाला असून तो अनुशासनात्मक रिकॉर्डशी जोडला गेलाय. मागील 24 महिन्यात त्याचा हा पहिला अपराध आहे.
हेही वाचा : रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधूनही घेतली निवृत्ती? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
रविवारी इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये 61 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ही घटना घडली होती. हॅरी ब्रुकने मोहम्मद सिराला चौकार लगावला त्यामुळे पंत बॉलच्या स्थितीबाबत नाखुश दिसला. तो अंपायरकडे गेला आणि यावेळी पॉल रीफेल याला बॉल गेजने तपासले आणि संतुष्ट होऊन बॉल परत केला. पण पंत यामुळे निराश दिसला, त्याने बॉल आपल्या हाताने जमिनीवर फेकला आणि अचानकपणे चालू लागला. पंतने मॅच रेफरी समोर त्याची चूक मान्य केली आणि शिक्षा स्वीकारली. सुनावल्या शिक्षेनुसार पंतच्या मॅच फीच्या ५० टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाणार असून त्याला एक डिमेरीट पॉईंट सुद्धा देण्यात येईल.
भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आधी केएल राहुलने मग त्यापाठोपाठ ऋषभ पंतने आपलं शतक पूर्ण केलं. मात्र राहुल आणि पंतने फलंदाजीत ठेवलेली ही लय टीम इंडियाच्या उर्वरित फलंदाजांना कायम ठेवता आली नाही. परिणामी 400 हुन अधिक धावांचं टार्गेट देण्याची अपेक्षा असताना टीम इंडिया (Team India) 364 धावांवर ऑल आउट झाली. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं.