Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सेंच्युरीनंतर ऋषभ पंतने त्याला Stupid म्हणणाऱ्या गावसकरांची 'ही' मागणी फेटाळली, नेमकं काय घडलं? Video

IND VS ENG 1st Test : भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आधी केएल राहुलने शतक पूर्ण केलं, त्यापाठोपाठ ऋषभ पंतने सुद्धा शतकीय कामगिरी केली. यासह ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. पंतने शतक पूर्ण केल्यावर कॉमेंट्री गॅलरीत येऊन भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी त्याच्याकडे एक विशेष मागणी केली, परंतु त्यांची ही मागणी पंतने फेटाळून लावली. 

सेंच्युरीनंतर ऋषभ पंतने त्याला Stupid म्हणणाऱ्या गावसकरांची 'ही' मागणी फेटाळली, नेमकं काय घडलं? Video

IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. सोमवारी 23 जून रोजी या सामन्याचा चौथा दिवस असून यादिवशी भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आधी केएल राहुलने शतक पूर्ण केलं, त्यापाठोपाठ ऋषभ पंतने सुद्धा शतकीय कामगिरी केली. यासह ऋषभ पंतने (Rishabh Pant) टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. पंतने शतक पूर्ण केल्यावर कॉमेंट्री गॅलरीत येऊन भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याच्याकडे एक विशेष मागणी केली, परंतु त्यांची ही मागणी पंतने फेटाळून लावली. 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानात सामना खेळवला जात आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय फलंदाजांनी कमालीची खेळी करून स्कोअर बोर्डवर तब्बल 471 धावसंख्या केली. यात भारताकडून यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतक ठोकले. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी 465 धावांवर ऑल आउट केले. ज्यामुळे भारताने 6 धावांनी आघाडी घेऊन फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. यावेळी सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शतक ठोकलं. केएल राहुलने 202 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. राहुलनंतर इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या इंनिंगमध्ये पुन्हा दमदार फलंदाजी करून ऋषभ पंतने भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासात नवा विक्रम केला. 

ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास : 

ऋषभ पंतने 130 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. ऋषभने याच सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा शतकीय कामगिरी केली होती. तेव्हा लागोपाठ दोन इनिंगमध्ये शतक ठोकणारा तो भारताचा पहिला विकेटकिपर फलंदाज ठरला. यापूर्वी कोणत्याही भारतीय विकेटकिपरने अशी कामगिरी केली नव्हती. यापूर्वी झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर या विकेटकिपर फलंदाजाने 2001 मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. ऋषभ पंतने शतक ठोकल्यावर तो पुढच्याच ओव्हरमध्ये शोएब बशीरच्या बॉलचा शिकार ठरला. 

हेही वाचा : बंगळुरू चेंगराचेंगरीनंतर BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, बनवले 10 नवे नियम, उल्लंघन केल्यास मोठी कारवाई

 

गावसकरांची मागणी फेटाळली : 

ऋषभ पंतने आयपीएल 2025 मध्ये आरसीबी विरुद्ध सामन्यात शतक ठोकल्यावर गोलांटी उडी मारून त्याचं सेलिब्रेशन केलं होतं. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा ऋषभ पंतने शतक पूर्ण केल्यावर गोलांटी उडी मारून सेलिब्रेशन केलं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा ऋषभ पंतने शतक पूर्ण केल्यावर तो अशाच प्रकारे सेलिब्रेशन करेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याने तसं केलं नाही आणि हेल्मेट कडून आकाशाकडे पाहिलं. यावेळी कॉमेंट्री बॉक्समधून ऋषभच्या शतकाचं कौतुक करण्यासाठी गावसकर गॅलरीत आले. त्यांनी ऋषभला इशारा करून त्याचं सिग्नेचर गोलांटी उडी सेलिब्रेशन करण्यास सांगितलं. पण पंतने त्यांना नकार दिला आणि पुढच्यावेळी तसं सेलिब्रेशन करेन असं सांगितलं. 

 पाहा व्हिडीओ : 

ऋषभ पंतला Stupid म्हणाले होते गावसकर : 

डिसेंबर 2025 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये चौथा टेस्ट सामना पार पडला होता. या सामन्यात महत्वाच्यावेळी खराब शॉट खेळून स्वस्तात विकेट गमावल्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर पंतवर संतापले. यानंतर त्यांनी ऋषभ पंतला तीनवेळा Stupid, Stupid, Stupid म्हणजेच मूर्ख असं म्हंटलं. गावसकरांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. मात्र इंग्लंड विरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतची शतकीय खेळी पाहून गावसकर त्याच्यावर भलतेच इम्प्रेस झाले आणि कॉमेंट्री बॉक्समधून त्यांनी तीनवेळा 'Superb, Superb, Superb' म्हणजेच उत्कृष्ट असं म्हटलं. 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

Read More