Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IPL 2025 मध्ये मिळवली ऑरेंज कॅप, पण पहिल्या टेस्टमध्ये भोपळाही फोडला नाही, टीम इंडियाची घोर निराशा!

IND VS ENG 1st Test : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियात साई सुदर्शनला टेस्ट पदार्पणाची संधी देण्यात आली, मात्र या संधीचं तो सोनं करू शकला नाही.  

IPL 2025 मध्ये मिळवली ऑरेंज कॅप, पण पहिल्या टेस्टमध्ये भोपळाही फोडला नाही,  टीम इंडियाची घोर निराशा!

IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार आहे. 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली असून शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्यांदाच टेस्ट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियात साई सुदर्शनला (Sai Sudarshan) टेस्ट पदार्पणाची संधी देण्यात आली, मात्र या संधीचं तो सोनं करू शकला नाही.  

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना शुक्रवार 20 जून पासून यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. दुपारी 3: 30 वाजता या सामन्याला सुरुवात झाली असून सामन्यापूर्वी झालेला टॉस इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकला. यावेळी त्याने प्रथम गोलंदाजी निवडली आणि टीम इंडियाला फलंदाजीचं आव्हान दिलं. टॉसनंतर दोन्ही संघांनी आपली प्लेईंग 11 जाहीर केली यावेळी भारताचा युवा क्रिकेटर 23 वर्षीय साई सुदर्शनला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली. साई सुदर्शनने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2025 मध्ये 15 सामन्यात तब्बल 759 धावा ठोकून ऑरेंज कॅप मिळवली. साई सुदर्शन हा आयपीएल 2025 मधील सर्वाधिक धावा करणार फलंदाज होता. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील परफॉर्मन्सवरून त्याला इंग्लंड टेस्ट दौऱ्यात बीसीसीआयने संधी दिली. परंतु यात तो धावा करण्यात अपयशी ठरला. 

साई सुदर्शन शून्यावर बाद : 

टीम इंडियाकडून ओपनिंग फलंदाजीसाठी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांची जोडी मैदानात उतरली. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 91 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर केएल राहुल 42 धावा करून बाद झाला. टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी साई सुदर्शन मैदानात आला. तो भारताच्या धावसंख्येत अजून भर पाडेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही. साई सुदर्शन शुन्य धावांवर बाद झाला. साईने 4 बॉल खेळले मात्र यात तो एकही धाव करू शकला नाही.  साई सुदर्शनला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. 

हेही वाचा : IND VS ENG : पहिल्या टेस्ट मॅचमध्ये खेळाडूंनी हातावर का बांधली काळी फीत? टॉसनंतर झाला खुलासा

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक : 

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून 
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना  : 2 ते 6 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना  : 10 ते 14 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना  :  23 ते 27 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट 

Read More