Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कॅप्टन शुभमन गिलचा शतकीय कारनामा, ऐतिहासिक कामगिरी करत दिग्गजांच्या यादीत मिळवलं नाव

IND VS ENG 1st Test : टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. यावेळी यशस्वी जयस्वालनंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार शुभमन गिलने सुद्धा इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडत सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक ठोकलं. 

कॅप्टन शुभमन गिलचा शतकीय कारनामा, ऐतिहासिक कामगिरी करत दिग्गजांच्या यादीत मिळवलं नाव

IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली, यावेळी सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. यावेळी यशस्वी जयस्वालनंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार शुभमन गिलने सुद्धा इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडत सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक ठोकलं. 

18 वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना शुक्रवार 20 जून पासून यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. दुपारी 3: 30 वाजता या सामन्याला सुरुवात झाली असून सामन्यापूर्वी झालेला टॉस इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकला. यावेळी त्याने प्रथम गोलंदाजी निवडली आणि टीम इंडियाला फलंदाजीचं आव्हान दिलं. 

कर्णधार शुभमनचं शतक : 

टीम इंडियाकडून ओपनिंग फलंदाजीसाठी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांची जोडी मैदानात उतरली. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 91 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर केएल राहुल 42 धावा करून बाद झाला. टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी साई सुदर्शन मैदानात आला.  मात्र तो डकआउट होऊन बाहेर पडला. त्यानंतर यशस्वीने कर्णधार शुभमन गिल सोबत पार्टनरशिप करून भारताची धावसंख्या 200 पार पोहोचवली. यादरम्यान सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने 144  बॉलमध्ये शतक ठोकलं. त्यानंतर शुभमन गिलने सुद्धा जबरदस्त फलंदाजी करून शतकीय कामगिरी केली. त्याने 74.2 ओव्हर सुरु असताना 140 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. 

रोहित शर्माच्या टेस्ट निवृत्तीनंतर शुभमन गिलवर टीम इंडियाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार म्हणून शुभमनची ही पहिलीच सीरिज आहे. या सीरिजमध्ये पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने हे शतक ठोकलं. यामुळे टीम इंडियाकडून टेस्टमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करत शतक ठोकणारा शुभमन गिल हा भारताचा चौथा कर्णधार ठरला. यापूर्वी 1951 मध्ये विजय हजारे, 1976 मध्ये सुनील गावसकर, 2014 माडेच विराट कोहलीने पहिल्यांदा टीम इंडियाच्या टेस्ट संघाचं नेतृत्व करताना अशी कामगिरी केली होती. 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

Read More