IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली, यावेळी सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. भारताच्या फलंदाजांनी इंग्लंड विरुद्ध जबरदस्त फलंदाजी करून पहिल्याच इनिंगमध्ये धावसंख्या 450 पार पोहोचवली आहे. टीम इंडियाचा (Team India) टेस्ट कर्णधार म्हणून शुभमन गिलचा (Shubman Gill) हा पहिला सामना आहे. या सामन्यात त्याने 147 धावांची कामगिरी करून फलंदाज म्हणूनही आपली प्रतिभा सिद्ध केली आणि भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले. मात्र हे सगळं करताना शुभमन गिलकडून एक छोटीशी चूक झाली, मात्र ही चूक कर्णधाराला महागात पडण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना शुक्रवार 20 जून पासून यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना प्रथम यशस्वी जयस्वालने 144 बॉलमध्ये शतक ठोकलं. या दरम्यान त्याने 16 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने देखील टीम इंडियासाठी शतकीय कामगिरी केली. त्याने 140 बॉलमध्ये 100 धावा पूर्ण केल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने सुद्धा हीच लय कायम ठेवत शतक ठोकलं. भारताने पहिल्या दिवशी जवळपास 300 हुन अधिक धावा केल्या. शुभमन गिलने पहिल्याच इनिंगमध्ये फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केलं, पण तो एका वेगळ्याच कारणामुळे अडचणीत सापडला आहे.
हेही वाचा : 23 वर्षांनी हेडिंग्समध्ये झाली इतिहासाची पुनरावृत्ती! ऋषभ पंतच्या शतकानंतर झाली कमाल, नेमकं काय घडलं होतं?
सामन्याच्या पहिल्या दिवशीचा कर्णधार शुभमन गिलचा फलंदाजी करतानाच एक फोटो व्हायरल होतोय. यात शुभमनने आयसीसीच्या ड्रेस कोड संदर्भातील नियमांचं उल्लंघन केलेलं पाहायला मिळतंय. गिलची ही चूक इंग्लंडच्या माध्यमांनी पकडली आणि त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल केला. टेस्ट क्रिकेट खेळताना आयसीसीने खेळाडूंसाठी काही नियम घालून दिले आहेत. या नियमांनुसार खेळाडूंना पांढरे, क्रीम रंगाचे किंवा राखाडी रंगाचे सॉक्स (पायमोजे) घालण्याची परवानगी आहे. परंतु शुभमनने फलंदाजी करताना पायात काळ्या रंगाचे सॉक्स घातलेले दिसतायत.
एमसीसीचा नियम 19.45 नुसार, खेळाडूंनी त्यांना ड्रेस कोडमध्ये ठरवून दिलेल्या तीन रंगांव्यतिरिक्त इतर कोणत्याही रंगाचे सॉक्स (पायमोजे) परिधान करू नये. 2023 पासून हा नियम लागू आहे. परंतु अद्याप कोणताही खेळाडू याचे उल्लंघन करताना आढळला नव्हता. मात्र ड्रेस कोडच्या नियमांच्या उल्लंघन करणं हा लेव्हल 1 चा गुन्हा मानला जातो. त्यानुसार उल्लंघन करणाऱ्या खेळाडूवर 10 ते 15 टक्के दंड आकारला जाऊ शकतो. शुभमन गिलने ड्रेस कोड संदर्भात केलेल्या चुकीवरून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जातं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या टेस्ट सामन्याचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन हे आहेत. आता ते शुभमन गिलवर या लहानश्या चुकीमुळे कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल.
How many of you have been fined for wearing black socks before pic.twitter.com/CMf1BN8lG0
— Sky Sports Cricket (SkyCricket) June 20, 2025
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर