Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

यशस्वी जयस्वालकडून एवढे कॅच का सुटले? समोर आलं मोठं कारण, अश्विनने केली पाठराखण

IND VS ENG 1st Test : लीड्स टेस्ट सामन्यात यशस्वीने फलंदाजीत उत्तम परफॉर्मन्स दिला, मात्र त्याने फिल्डिंग करताना अनेक कॅच सोडले. शेवटच्या दिवशी जेव्हा भारत विजयाची आशा करत होता तेव्हा बुमराह आणि सिराजच्या बॉलवर यशस्वीने कॅच सोडून क्रिकेट प्रेमींचा राग ओढवून घेतला. 

यशस्वी जयस्वालकडून एवढे कॅच का सुटले? समोर आलं मोठं कारण, अश्विनने केली पाठराखण

IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील लीड्समध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भारताचा 5 विकेटने पराभव झाला. या सामन्यात यशस्वी जयस्वालने (Yashavi Jaiswal) पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजीत शतक ठोकलं होतं. तर पंत, केएल राहुल आणि शुभमन यांनी सुद्धा शतकीय कामगिरी केली होती. मात्र तरी सुद्धा भारताचा दारुण पराभव झाला. लीड्स टेस्ट सामन्यात यशस्वीने फलंदाजीत उत्तम परफॉर्मन्स दिला, मात्र त्याने फिल्डिंग करताना अनेक कॅच सोडले. शेवटच्या दिवशी जेव्हा भारत विजयाची आशा करत होता तेव्हा बुमराह आणि सिराजच्या बॉलवर यशस्वीने कॅच सोडून क्रिकेट प्रेमींचा राग ओढवून घेतला. बुमराह आणि सिराजच्या बॉलवर यशस्वीने सोडलेले कॅच भारतासाठी मोठे नुकसानदायक ठरले.

कॅच ड्रॉपचा यशस्वीचा इतिहास :  

लीड्स टेस्टमध्ये अनेक महत्वाच्या कॅच सोडल्यामुळे यशस्वी जयस्वाल सोशल मीडियावर ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आहे. त्याला 'सीरियल कॅच ड्रॉपर' म्हणून संबोधलं जातंय. भारताचा माजी टेस्ट कर्णधार रोहित शर्माने सुद्धा यशस्वी जयस्वालला कॅच ड्रॉप करण्यावरून सुनावलं होतं. जयस्वालच्या फिल्डिंगबाबत सर्वात आधी चिंता डिसेंबर 2024 च्या मेलबर्न टेस्टमध्ये उठली होती. त्या सामन्यात त्यानं उस्मान ख़्वाजा, मार्नस लाबुशेन आणि पॅट कमिंसच्या कॅच सोडल्या होत्या. 

जयस्वालची खराब फिल्डींग : 

यशस्वी जयस्वालने फलंदाजीत टीम इंडियासाठी जबरदस्त कामगिरी केली. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये शतक ठोकल. मात्र फिल्डिंगमध्ये जयस्वाल तेवढाच फ्लॉप ठरला. त्याने फिल्डिंग करताना एक दोन नाही तर तब्बल 4 कॅच सोडले. बेन डकेटने मोहम्मद सिराजच्या बॉलवर एक हवेत शॉट खेळला, जो जयस्वालच्या फिल्डिंग रेंजमध्ये होता आणि तो पकडू शकत होता. मात्र यशस्वीच्या हातून बॉल सटकला, कॅच ड्रॉप झाल्याने गोलंदाज मोहम्मद सिराज रागाने लाल झाला आणि जयस्वालवर खूप चिडलेला दिसला.

हेही वाचा : माजी क्रिकेटरने उडवली टीम इंडियाची खिल्ली? कुत्र्याशी तुलना करत म्हणाला; ' डोकं आहे पण शेपटीच...'

 

जयस्वालने का सोडले एवढे कॅच?

यशस्वी जयस्वालने एवढे कॅच का ड्रॉप केले याचं स्वभाविक उत्तर असं की तो स्लिपचा फिल्डर नाहीये. देशांतर्गत सामन्यात यशस्वी अधिकतर मिड ऑन/ऑफ  वर फिल्डिंग करताना दिसला. जिथे बॉलचा पूर्वानुमान लावणं आणि धावणं गरजेचं असतं. लीड्स टेस्ट सामन्यात तो अधिकतर स्लिपमध्ये उभं राहून फिल्डिंग करत होता. स्लिपवर फिल्डिंग करणं हे प्रत्येक खेळाडूसाठी सोपं नसतं. यासाठी खास ट्रेनिंगची सुद्धा गरज असते. यासाठी शारीरिक संतुलनमी खेळावर नजर ठेवणं आणि सर्वात महत्वाचं परिस्थितीशी परिचित होणं गरजेचं असत. गेमवर तात्काळ रिस्पांड करण्याची क्षमता एका रात्रीत येत नाही. 

अश्विनने केली जयस्वालची पाठराखण : 

भारताचा माजी गोलंदाज आर अश्विनने यशस्वी जयस्वालची पाठराखण करत म्हटले की, 'स्लिपमध्ये तुम्ही सहज कॅच घेऊ शकत नाही. इथे मिड-ऑफसारखी परिस्थिती नाही. इथे त्वरित रिस्पांड आणि टेक्निकची आवश्यकता असते. तो लवकरच हे सर्व शिकेल. अश्विनच म्हणणं जरी बरोबर असलं तरी मग असा प्रश्न पडतो की अनुभव नसलेल्या खेळाडूला स्लिपमध्ये का फिल्डिंगसाठी सेट करण्यात आलं? तर याचं कारण आहे विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताकडे स्लिपवर चांगल्या खेळाडूंची कमतरता आहे. रोहित, कोहली, रहाणे हे खेळाडू या जागेवर फिल्डिंग करतील असे विश्वासू खेळाडू आहेत. जयस्वालला स्लिपरची जबाबदारी देणे हे केवळ चुकीचं नाही तर त्याच्यासाठी धोकादायक सुद्धा आहे. स्लिपरवर फिल्डिंग करण्याची टेक्निक अद्भुत आहे आणि ती अनुभवासोबतच येते. 

Read More