IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. 24 जून रोजी या सामन्याचा शेवटचा दिवस असून टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे आव्हान दिले आहे. मात्र पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूंकडून फिल्डिंग करताना अनेक चुका झाल्या ज्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना जीवदान मिळालं. इंग्लंडच्या सलामी जोडीने 188 धावांची पार्टनरशिप केली, तो पर्यंत टीम इंडियाच्या गोलंदाजांना एकही विकेट घेणं शक्य झालं नव्हतं. दरम्यान यशस्वी जयस्वालने (Yashavi Jaiswal) 98 धावांवर इंग्लंडच्या एका स्टार फलंदाजाचा कॅच सोडला. ज्यामुळे सिराजचा राग अनावर झाला आणि सोशल मीडियावर सुद्धा त्याला ट्रोलिंगला समोर जावं लागत आहे.
यशस्वी जयस्वालने फलंदाजीत टीम इंडियासाठी जबरदस्त कामगिरी केली. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये शतक ठोकल. मात्र फिल्डिंगमध्ये जयस्वाल तेवढाच फ्लॉप ठरला. त्याने फिल्डिंग करताना एक दोन नाही तर तब्बल 4 कॅच सोडले. बेन डकेटने मोहम्मद सिराजच्या बॉलवर एक हवेत शॉट खेळला, जो जयस्वालच्या फिल्डिंग रेंजमध्ये होता आणि तो पकडू शकत होता. मात्र यशस्वीच्या हातून बॉल सटकला, कॅच ड्रॉप झाल्याने गोलंदाज मोहम्मद सिराज रागाने लाल झाला आणि जयस्वालवर खूप चिडलेला दिसला. यशस्वी जयस्वालच्या खराब फिल्डींगचा व्हिडीओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला आणि भारत पराभवाच्या उंबरठ्यावर असताना त्याची नेटकऱ्यांकडून खूप ट्रोलिंग केली जातं आहे.
Unending Story From Yashaswi Jaisalwal ; Never Caught A Catch In Important Time . Measure Reason For Lose pic.twitter.com/b36l52rDUt
— Saqlain (SaqlainHameeed) June 24, 2025
भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आधी केएल राहुलने मग त्यापाठोपाठ ऋषभ पंतने आपलं शतक पूर्ण केलं. मात्र राहुल आणि पंतने फलंदाजीत ठेवलेली ही लय टीम इंडियाच्या उर्वरित फलंदाजांना कायम ठेवता आली नाही. परिणामी 400 हुन अधिक धावांचं टार्गेट देण्याची अपेक्षा असताना टीम इंडिया (Team India) 364 धावांवर ऑल आउट झाली. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं.
हेही वाचा : 'एकीकडे मोहम्मद तर दुसरीकडे कृष्णा...' कर्णधार शुभमन गिल हे काय बोलून गेला? Video Viral
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर