IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली, यावेळी सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. यावेळी टीम इंडियाचा स्टार युवा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashavi Jaiswal) इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडत सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक ठोकलं.
18 वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली त्यानंतर त्यांना अद्याप एकदाही इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्यात यश आले नाही. आता युवा खेळाडूंनी भरलेल्या या भारतीय संघावर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकण्याची जबाबदारी आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला सामना शुक्रवार 20 जून पासून यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. दुपारी 3: 30 वाजता या सामन्याला सुरुवात झाली असून सामन्यापूर्वी झालेला टॉस इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने जिंकला. यावेळी त्याने प्रथम गोलंदाजी निवडली आणि टीम इंडियाला फलंदाजीचं आव्हान दिलं.
टीम इंडियाकडून ओपनिंग फलंदाजीसाठी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांची जोडी मैदानात उतरली. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 91 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर केएल राहुल 42 धावा करून बाद झाला. टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी साई सुदर्शन मैदानात आला. मात्र तो डकआउट होऊन बाहेर पडला. त्यानंतर यशस्वीने कर्णधार शुभमन गिल सोबत पार्टनरशिप करून भारताची धावसंख्या 200 पार पोहोचवली. यादरम्यान सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने 144 बॉलमध्ये शतक ठोकलं. या दरम्यान त्याने 16 चौकार आणि 1 षटकार मारला. हे यशस्वीचं टेस्ट क्रिकेटमधील 5 वं शतक होतं.
हेही वाचा : IPL 2025 मध्ये मिळवली ऑरेंज कॅप, पण पहिल्या टेस्टमध्ये भोपळाही फोडला नाही, टीम इंडियाची घोर निराशा!
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर