IND vs ENG, Jasprit Bumrah Injured: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. आता अजून खेळाडू जखमी आहे अशी चर्चा आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा फिटनेस चर्चेचा विषय ठरली आहे. तिसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान बुमराह मैदानाबाहेर गेल्यामुळे चाहत्यांमध्ये आणि टीम मॅनेजमेंटमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल यांनी बुमराहच्या दुखापतीविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मोर्ने मोर्कल यांनी सांगितलं की, " बुमराह सीढ्यांवरून उतरताना त्याच्या डाव्या घोट्याच्या इथे मुरगाळले गेले. त्यामुळे काही काळासाठी त्याला मैदान सोडावं लागलं. पण परिस्थिती गंभीर नाही आणि तो लवकरच पुन्हा संपूर्ण ताकदीनिशी खेळणार आहे. त्याचवेळी, त्यांनी बुमराहप्रमाणेच मोहम्मद सिराजच्याही दुखापतीचा उल्लेख केला. सिराजच्या पायाला बॉलिंग फॉलो-थ्रूमध्ये एक ‘फुटहोल’ लागल्यामुळे त्रास झाला होता."
हे ही वाचा: IND vs ENG: अंशुल कंबोजच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाचं नुकसान, रवींद्र जडेजा संतापला! Video Viral
बुमराहने चहा ब्रेकपूर्वी मैदानात पुनरागमन केलं आणि जेमी स्मिथचा बळी घेतला. मात्र तो संपूर्ण सत्रात पायामुळे अस्वस्थ दिसला. त्याने 28 षटकांत 95 धावा देत 1 विकेट घेतली. याच दरम्यान त्याच्या वेगात घट दिसून आली, जी चिंतेचा विषय ठरली.
सामान्यतः 140 किमी/तास वेगाने चेंडू टाकणाऱ्या बुमराहचा वेग या सामन्यात 120-130 च्या दरम्यान होता. अनुभवी मोहम्मद सिराजही काहीसा मंदावलेला वाटला, तर अंशुल कंबोज याचाही वेग 120 किमी/तासाच्या आसपास राहिला. यामुळे टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांच्या फिटनेस आणि स्टॅमिनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हे ही वाचा: करुण नायरची कारकीर्द संपली ? कॅमेऱ्यासमोर ओक्साबोक्शी रडताना दिसला क्रिकेटपटू, के.एल. राहुलने दिला आधार
मोर्कल यांनी मान्य केलं की, सपाट खेळपट्टीवर गोलंदाजांना अतिरिक्त ऊर्जा आणि वेग आवश्यक असतो. कारण अशा पिचवर चेंडू फारसा हलत नाही, आणि त्यामुळे बॅकफूटवर कॅच, एल्बीडब्ल्यू किंवा बाउंसरने गडबड करावी लागते. त्यांनी टीम मॅनेजमेंटकडून यावर लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले.
अंशुल कंबोजचा हा पहिलाच कसोटी सामना आहे, त्यामुळे त्याच्याकडून लगेच मोठी अपेक्षा ठेवणं योग्य नसल्याचंही मोर्कल यांनी स्पष्ट केलं. त्यांनी टीम इंडियाचं एक बॅलन्स्ड फास्ट बॉलिंग युनिट बनवायचं आहे, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा: 'त्याचं तर आधीच ...', ऋषभ पंतने चहल आणि आरजे महवशच्या नात्याबद्दल केला खुलासा, दोघांनी उरकला साखरपुडा?
इंग्लंडने 7 गडी गमावून 544 धावा करत भारतावर 186 धावांची आघाडी घेतली आहे. भारताची पहिली डावात 358 धावांवर आटोपली होती. इंग्लंडचा जोर कायम असून, भारतीय गोलंदाजांना सपाट पिच आणि कमी वेगामुळे अडथळे येत आहेत. बुमराह आणि सिराज तंदुरुस्त राहणं ही भारतासाठी केवळ या कसोटीच नव्हे, तर आगामी मालिकांसाठीही अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे.