IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना सध्या बर्लिंघममध्ये खेळवला जात असून रविवारी या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. टीम इंडियाने शनिवारी चौथ्या दिवशी शुभमनच्या 161 खेळीच्या बळावर 6 विकेट गमावून 427 धावांवर दुसरा डाव घोषित केला होता. आणि पहिल्या डावात मिळालेल्या 180 धावांच्या बळावर भारताने दुसऱ्या डावात 607 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं मोठं आव्हान दिलं. दरम्यान टीम इंडियाचा (Team India) उपकर्णधार असलेला ऋषभ पंत मैदानात फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने त्याची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला ज्याला पंतने चोख उत्तर दिले. तसेच या संभाषणादरम्यान ऋषभ पंत (Rishabh Pant) शतकांचा हिशोब कसा ठेवतो याविषयी सुद्धा लोकांना माहिती मिळाली.
भारताचा उपकर्णधार आणि विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत पहिल्या टेस्ट सामन्यापासूनच इंग्लंड विरुद्ध जबरदस्त फलंदाजी करत आहे. ऋषभ पंतने लीड्स टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये शतक ठोकलं होतं. त्यानंतर एजबेस्टन टेस्टमध्ये सुद्धा त्याने पहिल्या इनिंगमध्ये 25 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 65 धावांची कामगिरी केली. ऋषभने लीड्समध्ये दोन इनिंगमध्ये दोन शतक ठोकून रेकॉर्ड नोंदवला होता. तो अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला विकेटकिपर फलंदाज आहे.
एजबेस्टन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऋषभ पंत मैदानात फलंदाजी करत होता. त्यावेळी इंग्लंडचे फलंदाज त्याची फिरकी घेण्याचा प्रयत्न करत होते. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक पंत जवळ आला आणि त्याला म्हणाला, 'तू केलेले टेस्टमधील सर्वात वेगवान शतक कोणते?' यावर पंत म्हणाला, '80 ते 90 मिनिटं' (पंतचं म्हणणं होतं की, 80 ते 90 मिनिटांमध्ये त्याने शतक पूर्ण केलंय). ऋषभची शतकांचा हिशोब ठेवण्याची वेगळी पद्धत ऐकून कॉमेंट्री बॉक्समधील कॉमेंटेटर सुद्धा हसू लागले.
Records? RishabhPants reply will win your respect. asked about the fastest hundred and Pant’s response was pure humility. 2nd TEST, Day 4 | LIVE NOW on JioHotstar https://t.co/2wT1UwEcdi pic.twitter.com/MEx6HVDUJH
— Star Sports (StarSportsIndia) July 5, 2025
पुढे हॅरी ब्रुक त्याला म्हणाला, 'मी सर्वात वेगवान शतक 55 बॉलमध्ये लगावले, तू तसं आज करू शकतोस'. यावर पंत म्हणाला, 'असू दे, मी रेकॉर्डससाठी खूप लालची नाही. जर ते झालं तर झालं'.
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा