IND VS ENG 2nd Test : टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यात विजयाच्या अगदी जवळ आहे. एजबेस्टन टेस्टच्या शेवटच्या दिवशी इंग्लंड समोर विजयासाठी 536 धावांची आवश्यकता असताना भारताला विजयासाठी मात्र केवळ ७ विकेटची आवश्यकता आहे. भारतानं एजबेस्टन क्रिकेट मैदानावर आजतागायत एकही टेस्ट सामना जिंकलेला नाही. तेव्हा 58 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवण्यास टीम इंडियाचे (Team India) खेळाडू सुद्धा उत्सुक आहेत. मात्र टीम इंडियाच्या विजयावर पावसामुळे पाणी फेरलं जाऊ शकतं.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. या सीरिजमधील पहिला सामना इंग्लंडने ५ विकेटने जिंकला आणि सीरिजमध्ये 1-0 ने आघडी घेतली. दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने टॉस गमावला आणि प्रथम फलंदाजी केली. यावेळी भारतीय फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून 587 धावा केल्या. तर भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांना 407 धावांवर रोखण्यात यश आले. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने चौथ्या दिवशी शुभमनच्या 161 खेळीच्या बळावर 6 विकेट गमावून 427 धावांवर दुसरा डाव घोषित केला होता. आणि पहिल्या डावात मिळालेल्या 180 धावांच्या बळावर भारताने दुसऱ्या डावात 607 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं मोठं आव्हान दिलं. चौथ्या दिवशी इंग्लंडची दुसरी इनिंग सुरु झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या 3 विकेट घेतल्या. ज्यामुळे आता भारताला इंग्लंड विरुद्ध शेवटच्या दिवशी 7 विकेटची अपेक्षा आहे.
हेही वाचा : आपला पॅटर्नच वेगळा... पंत शतकांचा हिशोब कसा ठेवतो ऐकलं का? Stump Mic मधील रेकॉर्डींग समोर
एक्यूवेदर डॉट कॉमनुसार इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये रविवारी अधिकतर वेळ ढग दाटून येतील. तापमान 20 डिग्रीच्या जवळपास असेल. पावसाची शक्यता 12 टक्के एवढी आहे. तर सामन्यादरम्यान जवळपास एक तास पावसाची शक्यता आहे. जर सामना सुरु असताना एखाद तास पाऊस पडला तर टीम इंडियावर जास्त प्रभाव पडणार नाही, कारण ते 80 ओव्हर खेळू शकतील. परंतु पाऊस सलग न पडता मध्येमध्ये थोडा थोडा पडल्यास ओव्हर्सची संख्या अजून कमी होऊ शकते. जर पावसामुळे सामना झाला नाही तर सामना ड्रॉ होऊ शकतो. ज्यामुळे भारताला सीरिज 1-1 अशा बरोबरीत आणणं शक्य होणार नाही.
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा