Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral

Cricket News : टीम इंडियातील काही खेळाडू कपिल शर्मा शोमध्ये गेले होते. यावेळी संघातील खेळाडूंना काही विचित्र नावं देण्यात आली.   

कोण आहे टीम इंडियातील सासू? पंत आणि गंभीरने कपिलच्या शोवर केला खुलासा, Video Viral

Cricket News : टीम इंडियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून येथे ते इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळत आहेत. एजबेस्टन स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर धावांनी मोठा विजय मिळवला. ज्यामुळे भारताने सीरिजमध्ये 1-1 अशी आघडी घेतली आहे. आता तिसरा सामना हा 10 जुलै पासून लॉर्ड्सवर खेळवला जाणार असून यासाठी खेळाडू मैदानात कसून सराव करत आहेत. या खेळाडूंची ऑफ द फील्ड मस्ती सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाही. 

टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर सोबतच ऋषभ पंत, अभिषेक शर्मा आणि युजवेंद्र चहल इत्यादी प्रसिद्ध विनोदी शो 'द कपिल शर्मा शो' वर आले होते. या कार्यक्रमात खेळाडूंनी खूप मजा केली, दरम्यान यावेळी कपिलने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ऋषभ पंतने जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं. 

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ऋषभ पंतने बुमराहला म्हटले सासू : 

कपिलने खेळाडूंशी बातचीत करत असताना ऋषभ पंतला विचारलं की टीम इंडियात सासू सारखा वागणारा कोणता खेळाडू आहे. यावेळी पंतने बुमराहचं नाव घेतलं. यानंतर, जेव्हा 'काका' हा टॅग द्यायचा प्रश्न आला तेव्हा पंतने कुलदीप यादवचे नाव घेतले . ऋषभ पंतने मोहम्मद शमीला संघातील मेहुणा हा टॅग दिला. 

ऋषभ पंतची दमदार खेळी : 

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये ऋषभ पंत जबरदस्त फलंदाजी करत असून त्यानं लीड्समध्ये झालेल्या सीरिजमधील पहिल्या सामन्यात दोन शतक झळकावली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सुद्धा त्याने दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक ठोकलं. शुभमन गिलनंतर इंग्लंड सीरिजमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऋषभ पंत दुसरा भारतीय फलंदाज आहे. 

Read More