IND VS ENG 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवला जातोय. या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने शुभमनच्या दीड शतकीय खेळीच्या बळावर 6 विकेट गमावून 427 धावांवर दुसरा डाव घोषित केला होता. आणि पहिल्या डावात मिळालेल्या 180 धावांच्या बळावर भारताने दुसऱ्या डावात 607 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता इंग्लंडसमोर 608 धावांचं मोठं आव्हान असणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) दुसऱ्या इनिंगमध्येही वादळी खेळी केली. त्याने बर्मिंघममध्ये 400 धावाहून अधिकची खेळी करताच विराटचा एक मोठा विक्रम मोडून इतिहास रचला.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदाच टीम इंडियाच्या टेस्ट संघाचं नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलच्या बॅटमधून मोठ्या प्रमाणात धावा निघत आहेत. लीड्स टेस्टमध्ये कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या गिलने शतकीय कामगिरी केली. त्यानंतर बर्मिंघममधील दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्याने 269 धावांची खेळी केली. यासह इंग्लंडमध्ये भारताकडून द्विशतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. खेळाडू म्हणून सुद्धा एवढ्या धावा एका इनिंगमध्ये यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाने इंग्लंडमध्ये केल्या नव्हत्या. एवढंच नाही तर बर्मिंघम टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा गिलने आपल्या फलंदाजीने कहर केला.
इंग्लंडमध्ये शुभमन पहिल्या इनिंगमध्ये त्रिशतकाला मुकला असला तरी त्याने पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये दमदार खेळी करून ४०० हून अधिक धावांची खेळी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये 269 धावा केल्यावर शुभमनने दुसऱ्या इनिंगमध्ये 161 धावा केल्या. बर्मिंघम टेस्टमध्ये गिलने एकूण ४३० धावांची खेळी केली. अशी कामगिरी करणारा गिल भारताचा पहिला टेस्ट कर्णधार बनला. यापूर्वी विराट कोहलीने श्रीलंका विरुद्ध दिल्ली टेस्टमध्ये 293 धावा केल्या होत्या. माजी कर्णधार विराट कोहलीने 2017 मध्ये ही कामगिरी केली होती.
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा