Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास, सचिन अन् विराटला सोडलं मागे

IND VS ENG 2nd Test : लीड्स टेस्ट सामन्यात जयस्वालने शतक ठोकलं होतं मात्र एजबेस्टन टेस्ट दरम्यान जयस्वालला फलंदाजीत फार चांगली खेळी करता आली नाही, परंतु तरीही त्याने एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 

यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास, सचिन अन् विराटला सोडलं मागे

IND VS ENG 2nd Test : टीम इंडियाचा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashavi Jaiswal) यांनी एजबेस्टन टेस्ट दरम्यान एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यादरम्यान त्याने माजी फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यांची बरोबरी केली असून सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला मागे सोडलं आहे. यशस्वी जयस्वालने ही कामगिरी इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिजमधल्या एजबेस्टन टेस्टची दुसरी इनिंग खेळताना केली. जयस्वाल अशी कामगिरी करणारा दुसरा सर्वात युवा फलंदाज आहे. लीड्स टेस्ट सामन्यात जयस्वालने शतक ठोकलं होतं मात्र एजबेस्टन टेस्ट दरम्यान जयस्वालला फलंदाजीत फार चांगली खेळी करता आली नाही, परंतु तरीही त्याने एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 

यशस्वीने कोणता रेकॉर्ड बनवला? 

टीम इंडियाचा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात कमी इनिंगमध्ये संयुक्तपणे सर्वात वेगवान 2000 धावा पूर्ण करणारा भारताचा फलंदाज बनवला आहे. यासह त्याने भारताचे माजी फलंदाज राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. जयस्वालने एजबेस्टन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये १० धावापूर्ण करताना ही खेळी केली. दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी जयस्वालने 22 बॉलमध्ये 28 धावा केल्या. तर पहिल्या इनिंगमध्ये त्यानं 87 धावांची खेळी केली.

21 व्या टेस्ट सामन्यात केली कामगिरी : 

जयस्वालने 21 टेस्ट सामन्यात 40 इनिंग्समध्ये  53.10 च्या सरासरीने 2018 धावा केल्या. यात 5 शतक आणि 11 अर्धशतक सामील आहेत. यशस्वीने केवळ सचिनलाच नाही तर माजी फलंदाज विजय हजारे आणि गौतम गंभीर यांना सुद्धा मागे सोडलं आहे. यापूर्वी गौतम गंभीरने 43 इनिंगमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहली या लिस्टमध्ये कोणाच्याही जवळपास सुद्धा नाही. कारण त्याने ५३ इनिंगमध्ये २ हजार धावांचा टप्पा पूर्ण केल्या होत्या. 

जयस्वालने टेस्ट क्रिकेटमध्ये  40 इनिंगमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागने सुद्धा एवढ्याच इनिंगमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या होत्या. राहुल द्रविडने 1999 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टनमध्ये तर वीरेंद्र सेहवागने 2004 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईमध्ये ही कामगिरी केली होती. 

हेही वाचा W,W,W,W,W,W... मोहम्मद सिराजच्या पंजामुळे एजबेस्टन टेस्टमध्ये टीम इंडियाचं कमबॅक, भारताची मोठी आघाडी

 

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

 

Read More