India vs England 3rd Test: भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टेस्ट सामन्यात प्रेक्षकांना जबरदस्त थरार पाहायला मिळाला. पण पुन्हा एकदा भारतीय संघाने विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पराभव पत्करला. लीड्सप्रमाणेच या सामन्यातही भारताने शेवटच्या क्षणी सामना गमावला. इंग्लंडने हा सामना २२ धावांनी जिंकला. १९३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला टीम इंडिया दुसऱ्या डावात पत्त्यांच्या गठ्ठ्यासारखा कोसळला. लॉर्ड्सवर कर्णधार गिलनेही मनं मोडली.
या सामन्यात चार दिवस भारतीय संघ विजयाच्या शर्यतीत होता. पण पाचव्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्याच तासात सामना फिरवला. 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दुसरी डाव ताशाच्या पत्त्यांसारखी कोसळली. भारताला केवळ 23 धावांनी पराभव पत्करावा लागला. कर्णधार शुभमन गिल याच्याकडूनही लॉर्ड्सच्या मैदानावर अपेक्षा भंग झाल्या.
हे ही वाचा: 12 तास रेस्टॉरंटमध्ये काम, आईच्या कॅन्सरने जीवनाची गाडी घसरली... आता बुमराह-अक्षर पटेलचा टीममेट झाला कर्णधार
सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. भारताकडून बुमराहने पाच बळी घेतले, तर सिराजनेही चांगली साथ दिली. इंग्लंडकडून जो रूटने शानदार शतक झळकावले आणि संघाचा स्कोअर 387 पर्यंत नेला. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात खराब झाली, पण केएल राहुलने शतक ठोकत भारतीय संघाला सावरलं.
हे ही वाचा: रवी शास्त्री आणि अक्षय कुमार सोबत लॉर्ड्सवर सामना बघायला आलेली 'ती' आहे तरी कोण?
राहुलव्यतिरिक्त पहिल्या डावात ऋषभ पंतने 74 आणि रवींद्र जडेजाने 72 धावांची खेळी केली. भारताने इंग्लंडला चांगली टक्कर दिली. दुसऱ्या डावातही भारताने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडला 193 धावांचं लक्ष्य दिलं.
हे ही वाचा: कार्सने पकडली जडेजाची मान, रन घेण्यापासून रोखलं, भडकला जडेजा; लॉर्ड्स टेस्टमध्ये झाला मोठा गोंधळ
A determined and well fought innings
— BCCI (@BCCI) July 14, 2025
Took #TeamIndia close
Chin up, Ravindra Jadeja
Scorecard https://t.co/X4xIDiSmBg#ENGvIND | @imjadeja pic.twitter.com/jGpfgHAeNM
हे ही वाचा: "ये तूच घे भाई..." बाऊंड्रीजवळ फिल्डिंग करणाऱ्या बुमराहने चाहत्याला दिलं जबरदस्त उत्तर, पाहा Viral Video
भारताचा टॉप ऑर्डर पुन्हा एकदा अपयशी ठरला. मात्र खालच्या फळीतल्या फलंदाजांनी झुंज दिली. बुमराहने 54 चेंडू खेळत 5 धावा केल्या, तर सिराजनेही 30 चेंडू रोखत सामना वाचवायचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला जडेजाने संयम राखत विजयाची आशा जिवंत ठेवली. भारत फक्त 23 धावांनी मागे होता, तेवढ्यात सिराजच्या बॅटला शोएब बशीरच्या चेंडूने स्पर्श करत स्टंप उडाले आणि भारताचा पराभव निश्चित झाला. आता भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे.