IND VS ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील तिसरा टेस्ट सामना लॉर्ड्स मैदानावर खेळवला जातोय. 10 ते 14 जुलै दरम्यान हा सामना पार पडणार असून गुरुवारी या सामन्याचा पहिला दिवस होता. दुसऱ्या टेस्टमधून विश्रांती देण्यात आलेल्या भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला लॉर्ड्सवरील तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये सामील करण्यात आले. पहिल्या दिवशी बुमराहला (Jasprit Bumrah) एक विकेट घेणं शक्य झालं. परंतु सामना सुरु असताना बुमराहवर अचानक अटॅक झाला, ज्यामुळे काहीकाळासाठी सामना थांबण्यात आला होता.
भारत - इंग्लंडमधील दोन सामने हे हायस्कोअरिंग होते. मात्र तिसऱ्या सामन्याचा पहिला दिवस हा लो-स्कोरिंग राहिला ज्यात इंग्लंड पहिल्या दिवशी 300 धावांची खेळी सुद्धा करू शकले नाहीत. दरम्यान टीम इंडियाला सुद्धा जास्त विकेट घेणं शक्य झालं नाही. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या ४ विकेट घेतल्या आणि यात नितीशकुमार रेड्डीने २ तर बुमराह आणि जडेजाला प्रत्येकी 1 विकेट घेणं शक्य झालं. तर दिवसाअंती इंग्लंडचा स्कोअर 251 धावा होता.
लॉर्ड्स टेस्ट सामन्याचा पहिला सामना संपण्याच्या 15 मिनिटांपूर्वी अचानकपणे सामन्यात अडथळा आला. फिल्डिंग करणारा जसप्रीत बुमराह अचानकपणे बेचैन दिसला आणि हवेत हात चालवताना पाहायला मिळाला. जेव्हा त्याच्यावर कॅमेरा मारला तेव्हा कळले की लेडीबर्ड किड्यांची त्याच्यावर अटॅक केला होता. बुमराहच्या डोळ्याजवळ खूप लेडीबर्ड उडत होत्या, ज्यामुळे बुमराह खूप त्रासला होता. पाहता पाहता इतर खेळाडूंजवळ सुद्धा लेडीबर्ड किड्यांचा झुंड येण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे अंपायरने काहीवेळ सामना थांबवला. शेवटी 5 मिनिटं सामना थांबल्यावर तो पुन्हा सुरु करण्यात आला.
हेही वाचा : ऋषभ पंतची दुखापत किती गंभीर? तिसऱ्या मॅचमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट्स
A swarm of ladybirds stops play at Lords pic.twitter.com/49lKhYHXwn
Sky Sports Cricket (SkyCricket) July 10, 2025
भारताची प्लेईंग 11 :
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंडची प्लेईंग 11 :
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर