Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'लोकं माझ्या नावावर पैसे कमावतात...', लॉर्ड्समध्ये 5 विकेट घेऊन रेकॉर्डस् मोडणारा जसप्रीत बुमराह असं का म्हणाला?

IND VS ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे.       

'लोकं माझ्या नावावर पैसे कमावतात...', लॉर्ड्समध्ये 5 विकेट घेऊन रेकॉर्डस् मोडणारा जसप्रीत बुमराह असं का म्हणाला?

IND VS ENG 3rd Test : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) वर्क लोड मॅनेजमेंटमुळे दुसऱ्या टेस्टमधून आराम देण्यात आला. मात्र तिसऱ्या टेस्टमध्ये बुमराहचं पुनरागमन होताच त्याने पहिल्याच इनिंगमध्ये इंग्लंडच्या 5 फलंदाजांच्या विकेट घेऊन त्यांना माघारी धाडलं. ही कामगिरी त्याने तिसऱ्या टेस्टच्या पाहिल्या आणि दुसऱ्या दिवशी केली. पहिल्या दिवशी त्यानं 1 तर दुसऱ्या दिवशी त्याला दोन विकेट घेण्यात यश आले. हा जसप्रीत बुमराहच्या करिअरमधील 15 वा पाच विकेट हॉल होता. सध्या बुमराह त्याच्या फिटनेस आणि वर्क लोड मॅनेजमेंटमुळे चर्चेत असतो, तर अनेकदा त्याला यावरून ट्रोल सुद्धा केलं जातं. तेव्हा बुमराहने त्याच्या टीकाकारांवर पत्रकार परिषदेत भाष्य केले. 

बुमराहच्या 5 विकेट : 

जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीचे शिकार इंग्लंडचे फलंदाज जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, क्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर ठरले. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी बुमराहची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी तो म्हणाला की, 'जेव्हा मी भारतासाठी खेळतो, तेव्हा मी शक्य तितकं संघात योगदान देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण हे करण्यास सक्षम असाल, तेव्हा असे वाटते की संघाला चांगल्या स्थितीत आणले गेले आहे. मी याप्रकारे विचार करतो. जोपर्यंत मी ही जर्सी घातली आहे तोपर्यंत जजमेंट तर चालूच राहतील, कारण प्रत्येक क्रिकेटर त्यातून जातो. जोपर्यंत मी टीव्हीवर खेळत आहे तोपर्यंत लोकांचं जजमेंट देणं सुरूच राहील'. 

लोक माझ्या माध्यमातून पैसे कमावतात : 

जसप्रीत बुमराहला पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं की, तू चांगली कामगिरी करत असूनही तुझ्यावर टीका का केली जाते. यावर बुमराह म्हणाला की, 'ऑनर्स बोर्डवर नाव येणं खूप चांगली गोष्ट आहे. पण मला माहितीये की  चर्चा होत राहील. इथे एवढ्या खोल्या आहेत, एवढंच नाही तर जिथे प्रॅक्टिस करतो तेव्हा सुद्धा कॅमेरे असतात. हा व्युज आणि सब्सक्राइबर्सचा जमाना आहे. प्रत्येकजण काहीना काही सनसनीखेज, चटपटीत बातम्या बनवतात. खूप काही होत असतं, ते सर्वच माझ्या हातात नाही. लोकं माझ्या माध्यमातून पैसे कमावतात ती खूप चांगली गोष्टी आहे. कमीत कमी मला आशीर्वाद तरी देतील की माझ्यामुळे त्यांना व्यूज मिळाले. पण मी या सर्व गोष्टींबद्दल विचार करत नाही'.

हेही वाचा : बांगलादेशी अंपायरची पोलखोल, आकाशदीपला दोनदा चुकीचं आउट दिलं, DRS मध्ये स्पष्ट झालं

 

लॉर्ड्स टेस्टसाठी भारत - इंग्लंडची प्लेईंग 11 : 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर

Read More