IND VS ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यांच्यातील तिसरा सामना हा 10 जुलै पासून लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात येत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी पहिल्या दिवशी भारताला इंग्लंडच्या 4 विकेट घेणं शक्य झालं, तर दिवसाअंती इंग्लंडचा स्कोअर 251 धावा होता. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांच्या तुलनेत इंग्लंडने पहिल्या दिवशी संथ खेळी केली. इंग्लंडचा उपकर्णधार जो रूटने (Joe Root) यावेळी डिसेंबरनंतर पहिल्यांदाच मैदानावर टिकून राहत शतकाच्या दिशेने वाटचाल केली. पहिल्या दिवशी रूटने नाबाद 99 धावा केल्या आता तो दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण करण्याच्या उद्देशाने उतरेल, परंतु यावेळी जडेजाने (Ravindra Jadeja) त्याला खुलं चॅलेंज दिलंय, सध्या याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी जो रूटने संयमित खेळी केली. ज्यात त्याने 67 वं अर्धशतक ठोकलं, 102 बॉलमध्ये त्याने ही कामगिरी केली. भारताने टी ब्रेकच्यानंतर हॅरी ब्रूकला बाद केलं. त्यानंतर बेन स्टोक्स आणि जो रूट यांनी 79 धावांची पार्टनरशिप केली.
रूटला पहिला दिवस संपण्यापूर्वी त्याच शतक पूर्ण करायचं होतं. परंतु पहिल्या दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर त्याने आकाश दीपच्या एका लेंथ डिलीवरीला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने पंच केला. मग तो लगेचच धाव घेण्यासाठी पळाला. जसा तो दुसरी धाव घेण्यासाठी मागे फिरला तेव्हा लॉर्डसमधील प्रेक्षक शतकापूर्वीच जल्लोष करू लागले. परंतू बेन स्टोक्स ओरडून म्हणाला 'नको' तेव्हा रूट पीचच्या मध्यावर येऊन परत फिरला.
हेही वाचा : जसप्रीत बुमराहवर अचानक झाला 'अटॅक', लॉर्ड्सवर थांबवावी लागली चालू टेस्ट मॅच, Video
Rule 1: Never risk it with imjadeja
Star Sports (StarSportsIndia) July 10, 2025
Rule 2: If you forget Rule 3rd TEST Day 2 FRI, JULY 11, 2:30 PM streaming on JioHotstar! pic.twitter.com/6chobVFsBL
जो रूट जेव्हा दुसरी धाव घेण्यासाठी धावला तेव्हा रवींद्र जडेजाने बॉल कलेक्ट केला होता. तो बॉल किपरकडे फेकण्याऐवजी त्याने जो रूटला शतक पूर्ण करण्याचं चॅलेंज दिलं. त्याने रूटला चिडवण्यासाठी हाताने इशारे केले आणि मग जमिनीवर बॉल ठेऊन दिला. पण रूटने यावर स्माईल केली आणि त्याने जडेजाचं चॅलेंज स्वीकारलं नाही. एक खेळाडू स्टंप माईकवर बोलताना म्हणाला, 'आज रात्री बनून देऊ नकोस'. ( रूटला आज रात्री 100 धावा बनवू देऊ नकोस).