Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG: ऋषभ पंतला दुखापत, वेदनेनं कळवळत सोडलं मैदान, लॉर्ड्समधून टीम इंडियासाठी वाईट बातमी

IND VS ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून याच्यातील तिसरा सामना हा लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. 

IND vs ENG: ऋषभ पंतला दुखापत, वेदनेनं कळवळत सोडलं मैदान, लॉर्ड्समधून टीम इंडियासाठी वाईट बातमी

IND VS ENG 3rd Test :  भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु आहे. यातील तिसऱ्या टेस्ट सामन्याला 10 जुलै पासून सुरुवात होणार आहे. यात टॉस जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी निवडली असल्याने भारताला गोलंदाजीसाठी मैदानात यावे लागले. परंतु विकेटकीपिंग करताना ऋषभ पंतला दुखापत झाली, त्यानंतर पंत हा वेदनेनं कळवळत मैदानातून बाहेर पडताना दिसला. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

नेमकं काय घडलं? 

लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनमध्ये टीम इंडियाला मोठा झटका बसला. 34 व्या ओव्हर दरम्यान विकेटकिपर ऋषभ पंत अचानकपणे मैदान सोडून ड्रेसिंग रूममध्ये जाऊ लागला. 34 व्या ओव्हरला ऋषभ पंतच्या डाव्या हाताला बॉल लागला. त्यानंतर तो वेदनेनं कळवळू लागला. बुमराहच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलला कलेक्ट करताना पंत दुखापतग्रस्त झाला. मैदानात फिजिओला बोलवण्यात आले. पण प्रथमोपचार केल्यावर सुद्धा तो ठीक दिसला नाही. तथापि, त्याने कसे तरी स्वतःला विकेटकीपिंगसाठी तयार केले. त्याने ओव्हर संपवली आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला पर्यायी विकेटकीपर म्हणून मैदानावर बोलावण्यात आले.

ऋषभ पंतची दुखापत किती गंभीर? 

ऋषभ पंतला दुखापत झाल्यामुळे त्याचं टेन्शन वाढलं आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. क्रिकेट फॅन्स आशा करतायत की त्याची दुखापत गंभीर नसावी, आणि तो पुन्हा मैदानावर दिसावा. ऋषभ पंत फक्त विकेटकिपर म्हणूनच नाही तर फलंदाज म्हणून सुद्धा भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्याने लीड्स टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये शतक ठोकलं होतं. तसेच दुसऱ्या टेस्ट सामन्यात सुद्धा त्याने चांगली फलंदाजी केली होती. 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर

Read More