IND VS ENG 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) टेस्ट सीरिजमधील तिसरा सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. सोमवार 14 जुलै रोजी लॉर्ड्स टेस्टचा शेवटचा दिवस असून या दिवशी मैदानात भरपूर ड्रामा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड दुसऱ्या इनिंगमध्ये 192 धावांवर ऑलआउट झाला. तर चौथ्या दिवशी भारताने 4 विकेट गमावून 58 धावा केल्या आणि दिवस संपला. शेवटच्या दिवशी टीम इंडिया (Team India) विजयाच्या खूप जवळ असून त्यांना सामना जिंकून सीरिजमध्ये आघाडी घेण्यासाठी 135 धावांची आवश्यकता आहे. तर इंग्लंडला हा टेस्ट सामना जिंकण्यासाठी 6 विकेटची गरज आहे. जर भारताला लॉर्ड्स टेस्टमध्ये शेवटच्या दिवशी विजय मिळवायचा असेल तर त्यांना 3 मोठे कारनामे करावे लागतील.
भारतीय संघासाठी सध्या चांगली गोष्ट ही आहे की केएल राहुल 33 धावांवर नाबाद आहे. आतापर्यंत ४७ बॉलचा सामना करून त्याने ६ चौकार लगावले. पाचव्या दिवशी भारतीय संघामध्ये केएल राहुलची भूमिका महत्वाची असणार आहे. केएल राहुलने पहिल्या इनिंगमध्ये या पीचवर दमदार शतक ठोकलं. केएल राहुलला माहित आहे की कठीण पीचवर कशी खेळी खेळायला हवी. पाचव्या दिवशी सुरुवातीचे 1 तास भारतीय फलंदाजांना विकेट गमावण्यापासून वाचायला हवे. केएल राहुल आणि ऋषभ पंतने सुरुवातीचा एक तास विकेट गमावली नाही तर ते इंग्लंडच्या गोलंदाजांवर हावी होऊ शकतात. जर इंग्लंडच्या गोलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या तासात भारताची एकही विकेट घेतली नाही तर त्यांच्यावर दबाव येईल, ज्याचा फायदा केएल राहुल आणि ऋषभ पंत घेऊ शकतात.
टीम इंडियाने 58 धावांवर 4 विकेट गमावल्या आहेत. भारताला विजयासाठी 135 धावांची आवश्यकता आहेत. अशात ऋषभ पंतला लॉर्ड्स टेस्टच्या शेवटच्या दिवशी जबरदस्त फलंदाजी करावी लागेल. पंतला आज गाबा प्रमाणे ऐतिहासिक कामगिरी करावी लागेल. तर दुसरीकडे केएल राहुलला सुद्धा पंत सोबत चांगली पार्टनरशिप करावी लागेल. जर दोघांनी 70 ते 80 धावांची पार्टनरशिप केली तर ते भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवू शकतील.
हेही वाचा : इंग्लंडच्या खेळाडूला खांद्याने धक्का देणं मोहम्मद सिराजला महागात पडलं, ICC ने सुनावली मोठी शिक्षा
भारताची धावसंख्या सध्या 58 धावांवर 4 विकेट अशी आहे. त्यांना विजयासाठी 135 धावा कराव्या लागतील. रवींद्र जडेजा, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर इत्यादींना सुद्धा टीम इंडियाच्या फलंदाजीमध्ये चांगली साथ द्यावी लागेल. राहुल आणि ऋषभ पंतनंतर खालच्या क्रमांकावर रवींद्र जडेजा, नीतीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना चांगली पार्टनरशिप करावी लागेल. जर भारताने तिसरा टेस्ट सामना जिंकला तर ते सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी मिळतील.