Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

रोहित शर्मानं बेन स्टोकला आऊट करण्यासाठी असा प्लॅन आखला; आणि पहिल्याच चेंडूला...पाहा व्हिडीओ

रोहित शर्माचं नियोजन यशस्वी ठरलं आणि बेन स्टोक फसला

रोहित शर्मानं बेन स्टोकला आऊट करण्यासाठी असा प्लॅन आखला; आणि पहिल्याच चेंडूला...पाहा व्हिडीओ

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना नुकताच पार पडला. नरेंद्र मोडी स्टेडियमवर अटीतटीच्या सामन्यात भारताचा विजय झाला. या विजयामध्ये हिटमॅन रोहित शर्माचा मोठा वाटा आहे. भारत आणि इंग्लंड संघानं टी 20 मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी केली आहे.
फील्डिंगदरम्यान कर्णधार विराट कोहलीला दुखापत झाली त्यावेळी त्यानं मैदान सोडलं. कर्णधारपदाची सूत्र रोहित शर्माच्या खांद्यावर आली. त्यावेळी रोहितनं बॉलिंगची संधी शार्दुल ठाकूरवर सोपवली. निसटता विजय खेचून आणण्यासाठी रोहितनं एक योजना आखली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

रोहितनं आखलेल्या योजनेत इंग्लंडचा फलंदाज फसला आणि ती यशस्वी झाली. याचा आनंद टीम इंडियानं साजरा केला. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता शार्दुलला रोहित शर्मा काहीतरी समजवत आहे. त्यानंतर बॉल टाकायला सांगतो. शार्दुलनं टाकलेल्या बॉलवर बेन स्टोक षटकार मारण्याच्या तयारीत असतानाच तो बॉल सूर्यकुमार यादव कॅच पकडतो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read More