Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

जसप्रीत बुमराह चौथी टेस्ट मॅच खेळणार की नाही? मॅनेजमेंटने घेतला मोठा निर्णय

IND VS ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु आहे. यातील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. 

जसप्रीत बुमराह चौथी टेस्ट मॅच खेळणार की नाही? मॅनेजमेंटने घेतला मोठा निर्णय

IND VS ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना हा मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे.  यात आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी एक सामना भारताने तर दोन सामने इंग्लंडने जिंकलेत. परिणामी इंग्लंडने सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियाला (Team India) जर आघाडी घ्यायची असेल तर मँचेस्टरमध्ये होणारा चौथा सामना हा त्यांना काहीही करून जिंकावं लागेल. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा या सीरिजमधील फक्त तीन सामने खेळेल असं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं होतं. सीरिजमधील  2 सामने यापूर्वीच बुमराहने खेळले होते. असं असतानाच बुमराह 23 जुलै पासून मँचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत माहिती मिळाली आहे. 

फक्त तीन सामने खेळणार होता बुमराह :

टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने आधीच सांगितलं होतं की वर्क लोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराह या सीरिजमध्ये फक्त तीन सामने खेळेलं. त्याप्रमाणे पहिल्या सामन्यात बुमराहला खेळवण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या टेस्ट सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली. तर तिसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा प्लेईंग 11 मध्ये संधी दिली. बुमराहने पहिल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या तर लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सुद्धा बुमराहने पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतले. 

हेही वाचा : मँचेस्टरमध्ये 'या' गोलंदाजांना मैदानात उतरवलं तर भारताचा विजय पक्का!

 

असिस्टंट कोचने केलं स्पष्ट : 

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराहला इंग्लंड विरुद्ध महत्वपूर्ण अशा चौथ्या टेस्ट सामन्यात खेळणार आहे. बुमराहबाबत टीम इंडियाचा असिस्टंट कोच रयान टेन डोशेटने एक महत्वाचं विधान केलं आहे. असिस्टेंट कोचने स्पष्ट केलं की बुमराह सुद्धा या टेस्ट सामन्यात खेळणार आहे. त्याने म्हटले की, 'आम्ही मँचेस्टरमध्ये हा निर्णय घेऊ, आम्हाला माहितीये की आम्हाला त्याला उर्वरित 2 सामन्यांपैकी एका सामन्यात खेळवायचं आहे. मला वाटतंय की आता मँचेस्टरचा सामना टीम इंडियासाठी फार निर्णायक असणार आहे. तेव्हा यात त्याला खेळवले जाईल याची शक्यता जास्त आहे. 

गावसकरांनी बुमराहवर केली टीका : 

बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुले यापूर्वी बर्लिंघम टेस्टमध्ये सुद्धा आराम दिला गेला होता. त्यानंतर बुमराहच्या फिटनेसबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. सुनील गावसकर बुमराहला विश्रांती देण्याबाबत अजिबात सहमत नाहीत. सुनील गावसकरांनी म्हटले की, 'कोणताही सुपरस्टार खेळाडू असो त्याला सीरिज दरम्यान ब्रेक दिला गेला नाही पाहिजे'. सुनील गावसकरने सांगितलं की, जे खेळाडूंना पहिल्या तीन टेस्ट सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही त्यांनी ब्रेक दरम्यान इंग्लंडमध्ये घरगुती क्रिकेट खेळायला हवे'. 

Read More