Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG: दुसऱ्या दिवशी पावसाचं संकट? मँचेस्टर टेस्टमधील खेळावर हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता!

IND vs ENG 4th Test Day 2 Manchester Weather Update: भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर सतत ढग दिसत होते, परंतु पाऊस पडला नाही. आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या दिवशीच्या हवामानावर आहेत.  

IND vs ENG: दुसऱ्या दिवशी पावसाचं संकट? मँचेस्टर टेस्टमधील खेळावर हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता!

IND vs ENG 4th Test Day 2 Manchester Weather Update: मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचा दुसरा दिवस खेळला जाणार आहे. पहिल्या दिवशी मैदानावर ढगाळ वातावरण होतं, पण सुदैवानं पावसानं खेळात अडथळा निर्माण केला नाही. आता सगळ्यांचं लक्ष दुसऱ्या दिवशी हवामान कसं असेल याकडे लागलं आहे.

पहिल्या दिवशी भारताचा स्कोअर काय? 

पहिल्या दिवशी टीम इंडियाने 4 गडी गमावत 264 धावा केल्या होत्या. यशस्वी जायस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी काहीसा चांगला सुरुवात दिली, तर शेवटी रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर नाबाद राहिले. मात्र दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता लक्षात घेता खेळावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हे ही वाचा: Rishabh Pant Injury: BCCI ने ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल दिलं अधिकृत अपडेट, म्हणाले.." त्याला रुग्णालयात स्कॅन...

 

दुसऱ्या दिवशी पावसाचं मोठं संकट?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळ सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. दिवसभरात 85 टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता असल्याने अनेक वेळा खेळ थांबवावा लागू शकतो. चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच निराशाजनक ठरू शकते. तापमानाची स्थिती पाहता, कमाल तापमान सुमारे 21 अंश सेल्सियस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सियस इतकं राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा: Rishabh Pant Injury: दुखापतग्रस्त पंतच्या जागी दुसरा खेळाडू फलंदाजी करणार? जाणून घ्या ICC चा नियम

पिचवरील ओलाव्यामुळे पुन्हा गोलंदाजांना होणार मदत?

पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामागचं मुख्य कारण होतं पिचवरची नमी, ज्याचा फायदा इंग्लिश जलदगती गोलंदाजांनी घेतला. दुसऱ्या दिवशीही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, जडेजा आणि ठाकूरसाठी हे आव्हान ठरू शकतं.

 

 

Read More