Mohammed Siraj Vs Ben Duckett Verbal Fight: भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. मँचेस्टर टेस्टमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात फक्त क्रिकेट नव्हे, तर शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. आता मालिका जसजशी पुढे सरकत आहे तसतसे खेळाडूंमधील वातावरणही तापत आहे. सामना जिंकण्यासाठी भारत ‘करो या मरो’ अशा स्थितीत असताना, दुसऱ्या दिवशी मैदानावर एक वेगळंच नाट्य घडलं. जेव्हा मोहम्मद सिराज आणि इंग्लंडचा ओपनर बेन डकेट आमनेसामने आले.
स्टार स्पोर्ट्स (Star Sports) ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, डकेट काही तरी अंपायरकडे तक्रार करत आहेत आणि दुसरीकडे सिराज उंगलीने इशारा करत काही बोलताना दिसतो. दोघांमधील हा तणावपूर्ण प्रसंग पाहून मैदानावरचं वातावरण काही काळासाठी तापलं.
हे यंदाचं पहिलंच भांडण नाही. या टेस्ट मालिकेत आधीही सिराज आणि डकेट यांच्यात तणाव निर्माण झाला होता. दोघांमधील झटापट आता पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.
इंग्लंडकडून बेन डकेटने जबरदस्त फलंदाजी करत फक्त 100 चेंडूंमध्ये 13 चौकारांच्या मदतीने 94 धावा फटकावल्या. मात्र शतकाकडे झेपावत असतानाच, डेब्यू करणाऱ्या अंशुल कंबोजने त्याला माघारी धाडलं.
भारताने पहिले फलंदाजी करत 358 धावा केल्या. साई सुदर्शन (61), ऋषभ पंत (54) आणि यशस्वी जायसवाल यांनी फटकेबाजी करत संघाला चांगली सलामी दिली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 5 बळी घेतले, तर जोफ्रा आर्चरला 3 विकेट मिळाल्या. दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने 2 बाद 225 धावा केल्या आहेत. झॅक क्रॉलीने 84 धावांची खेळी केली, तर ओली पोप (20*) आणि जो रूट (11*) नाबाद आहेत.
मँचेस्टरचा हा कसोटी सामना आता फक्त धावांचाच नाही, तर मनोधैर्याचाही झाला आहे. सिराज आणि डकेट यांच्यातील वाद हे दाखवतो की मैदानावरची स्पर्धा किती तीव्र झाली आहे. पुढचे दिवस या सामन्याला कोणतं वळण देतील, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
Stumps on Day 2 in Manchester!
— BCCI (@BCCI) July 24, 2025
Debutant Anshul Kamboj & Ravindra Jadeja pick a wicket each in the final session
England reach 225/2, trail by 133 runs.
Scorecard https://t.co/L1EVgGu4SI#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/YGTUz2uzwK
1. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काय आहे स्थिती?
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अखेरीस इंग्लंडने 2 बाद 225 धावा केल्या आहेत.
2. ऋषभ पंत दुसऱ्या दिवशी खेळला?
दुसऱ्या दिवशी पायाला दुखापत असूनही फलंदाजीसाठी मैदानात आला होता.
3. यष्टीरक्षक म्हणून कोणी काम पहिले?
ध्रुव जुरेल पंतच्या जागी सामन्याच्या दोन्ही डावात यष्टीरक्षक म्हणून काम पाहिलं.