Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG: अंशुल कंबोजच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाचं नुकसान, रवींद्र जडेजा संतापला! Video Viral

Ravindra Jadeja Get Angry On Anshul Kamboj: मँचेस्टर कसोटीत टीम इंडियाची अवस्था गंभीर झाली आहे. क्षेत्ररक्षणातील चुकीमुळे रवींद्र जडेजाने तरुण खेळाडू अंशुल कंबोजला मैदानावर फटकारले.  

IND vs ENG: अंशुल कंबोजच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाचं नुकसान, रवींद्र जडेजा संतापला! Video Viral

Ravindra Jadeja gets angry on Anshul Kamboj : मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. पहिल्या डावातील कमजोर फलंदाजी नंतर, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. विशेष म्हणजे अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजा याने नवोदित अंशुल कंबोजवर थेट मैदानातच संताप व्यक्त केला. हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आता खूप चर्चेत आला आहे. चला जाणून घेऊयात नक्की काय झालं... 

नक्की काय झालं?

प्रकरण इंग्लंडच्या डावातील 54व्या षटकात घडलं. जेव्हा रूट फलंदाजी करत होता आणि मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. रूटने गलीच्या दिशेने शॉट खेळला. गलीमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातावरून चेंडू सरकत जडेजाकडे गेला. जडेजाने क्षणार्धात चेंडू उचलून स्टंप्सकडे थ्रो केला. थ्रो अचूक होता, पण स्टंप्सजवळ कोणीच नव्हतं.

हे ही वाचा: 'त्याचं तर आधीच ...', ऋषभ पंतने चहल आणि आरजे महवशच्या नात्याबद्दल केला खुलासा, दोघांनी उरकला साखरपुडा?

 

जडेजा चांगलाच संतापला

जर योग्य वेळी कोणीतरी तिथं असतं, तर रूटला सहज रनआउट करता आलं असतं. पण कंबोज, जो मिड-ऑनला उभा होता, तो चेंडू घेण्यासाठी धावला. मात्र त्याने थोडा वेळ घेतला आणि थ्रोचा संधीचा उपयोग झाला नाही. त्यामुळे जडेजा चांगलाच संतापला आणि कंबोजला स्पष्ट शब्दांत सुनावलं की, “तुला स्टंपजवळच असायला हवं होतं!”

हे ही वाचा: करुण नायरची कारकीर्द संपली ? कॅमेऱ्यासमोर ओक्साबोक्शी रडताना दिसला क्रिकेटपटू, के.एल. राहुलने दिला आधार

 

जो रूटला मिळालं जीवनदान

कंबोजच्या या चुकेमुळे जो रूटला मोठं जीवनदान मिळालं, आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. पुढे रूटने शतक पूर्ण करत 150 धावांची जबरदस्त खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 248 चेंडूत 14 चौकारांचा समावेश होता.

हे ही वाचा: भारताने FIDE Women’s Chess World Cup मध्ये रचला इतिहास! दिव्या देशमुखनंतर कोनेरू हम्पीनेही गाठला अंतिम टप्पा

 

इंग्लंडची पकड भक्कम

तीन दिवसांच्या खेळानंतर इंग्लंडने 7 गडी गमावून 544 धावा केल्या असून त्यांना आता 186 धावांची आघाडी मिळाली आहे. सध्या क्रीजवर कर्णधार बेन स्टोक्स (77 धावा) आणि लियाम डॉसन (21 धावा) खेळत आहेत. त्याआधी भारताने पहिल्या डावात 358 धावा केल्या होत्या, पण त्यानंतर चुकांमुळे सामन्यावरची पकड गमावली.

 

Read More