IND VS ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 23 जुलै पासून चौथ्या टेस्ट सामन्याला सुरुवात होणार आहे. परंतु त्यापूर्वी अनेक स्टार खेळाडूंच्या दुखापतींमुळे टीम इंडिया (Team India) समोर मोठं टेन्शन आहे. लॉर्ड्स टेस्टमधील तिसऱ्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे ध्रुव जुरेल हा विकेटकिपिंगसाठी आला होता. त्यामुळे चौथ्या सामन्यात पंत हा विकेटकिपिंग करताना दिसणार की नाही याबाबत शंका असताना आता एक व्हिडीओ समोर आला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना हा मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. आधीच्या तीन सामन्यापैकी पहिला आणि तिसरा सामना हा इंग्लंडने जिंकला. तर भारताला दुसरा सामना जिंकण्यात यश आले होते. इंग्लंडने यासह सीरिजमध्ये 1-2 ने आघाडी घेतली आहे. जर पिछाडीवर असणाऱ्या टीम इंडियाला इंग्लंडची बरोबरी साधायची असेल तर त्यांना चौथा टेस्ट सामना जिंकावा लागेल.
मँचेस्टर टेस्टपूर्वी टीम इंडियातील अनेक खेळाडू दुखापतींनी संघर्ष करत आहेत. ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, आकाशदीप, अर्शदीप हे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. दोन गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने अंशुल कंबोजला कव्हर गोलंदाज म्हणून बोलवण्यात आलं आहे.
हेही वाचा : जसप्रीत बुमराह चौथ्या टेस्टमध्ये खेळणार की नाही? टीम इंडियामधून आली मोठी अपडेट
VIDEO Indian wicket-keeper batter Rishabh Pant (RishabhPant) resumes his keeping duty during the practice session at the Old Trafford Cricket stadium in Manchester, UK after sustaining an injury in the last Test. RishabhPant indiavsengland pic.twitter.com/L5xzJILONk
Press Trust of India (PTINews) July 21, 2025
भारताच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सर्वांची नजर ही ऋषभ पंतवर होती. त्याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने लॉर्ड्स टेस्टमध्ये विकेटकीपिंग केली नव्हती. पाचव्या दिवशी फलंदाजी करताना सुद्धा पंत खूप वेदनेत दिसला. परंतू सध्या समोर येत असलेल्या सरावाच्या व्हिडीओमध्ये पंत एक तास कीपिंग ड्रिल करताना दिसला. ज्यामुळे तो चौथ्या टेस्ट सामन्यासाठी फिट दिसतोय.