IND VS ENG 4th Test : मँचेस्टरमध्ये बुधवार 23 जुलै पासून भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजमधील चौथा सामना खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांपैकी एक सामना हा भारताने तर दोन सामने हे इंग्लंडने जिंकले. ज्यामुळे इंग्लंडने सीरिजमध्ये 1-2 ने आघाडी घेतली आहे. सीरिजमध्ये इंग्लंडशी बरोबरी साधायची असेल तर टीम इंडियाला (Team India) मँचेस्टर येथे होणारा चौथा सामना काहीही करून जिंकावा लागेल. मात्र या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेव्हा मँचेस्टरमधील पुढील 5 दिवसांचं हवामान कसं राहणार याविषयी जाणून घेऊयात.
एक्यूवेदरनुसार, बुधवारी ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर 93% ढग असणार राहतील तर 65% पावसाची शक्यता आहे. पहिल्या दिवशी तापमान 17-19 डिग्री एवढं राहील. पाऊस या मैदानावर पहिले फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अडथळा निर्माण करू शकते. पण चांगली गोष्ट ही की पुढील तीन दिवस पावसाची शक्यता कमी आहे. दुसऱ्या दिवशी पावसाची शक्यता 40%, तिसऱ्या दिवशी 7% आणि चौथ्या दिवशी 3% आहे.
मँचेस्टरचे ओल्ड ट्रॅफर्ड मैदान नेहमीच त्याच्या वेगवान आणि अतिरिक्त बाउन्स खेळपट्ट्यांसाठी ओळखले जाते. पण कालांतराने ओल्ड ट्रॅफर्डच्या खेळपट्ट्यांनी त्यांची धार गमावली आहे आणि मागच्या काही वर्षात त्या मंद होत चालल्या आहेत. तथापि, या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे खेळपट्टी पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त वेग आणि उसळी देऊन अनुकूल ठरू शकते.
हेही वाचा : गिल आणि गंभीरमध्ये ऑल इज नॉट वेल? टीम इंडियात टोकाचं राजकारण, भारतीय संघात नेमकं काय घडतंय?
भारताने ओल्ड ट्रॅफर्डच्या या मैदानावर पहिल्यांदा 1936 टेस्ट सामना खेळवला गेला, जो ड्रॉ झाला. टीम इंडियाने आतापर्यंत या मैदानावर एकूण 9 सामने खेळले असून यातील एकही सामन्यात त्यांना विजय मिळालेला नाही. टीम इंडियाने ओल्ड ट्रॅफर्डमध्ये सर्व सामने इंग्लंड विरुद्ध खेळले असून ज्यातील 4 सामन्यात त्यांचा पराभव झालाय तर 5 सामने ड्रॉ झाले. भारताला शेवटचा सामना ऑगस्ट 2014 मध्ये या मैदानावर खेळला होता, ज्यामध्ये त्यांना एक डाव आणि 54 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव/शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अंशुल कंबोज