Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

खांद्यावर हात अन्.... आकशदीपने बेन डकेटला दिला असा सेंडऑफ, ICC करणार कारवाई?

IND VS ENG 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून शेवटचा टेस्ट सामना हा 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान शेवटचा टेस्ट सामना जात आहे. 

खांद्यावर हात अन्.... आकशदीपने बेन डकेटला दिला असा सेंडऑफ, ICC करणार कारवाई?

IND VS ENG 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात मँचेस्टरमध्ये टेस्ट सीरिजचा शेवटचा सामना खेळवला जातोय. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा खेळ इंग्लंडच्या गोलंदाजी समोर 224 धावांवर आटोपला. इंग्लंडची फलंदाजी सुरु झाली तेव्हा भारतीय गोलंदाजांना घाम फोडत त्यांच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी केली. टेस्ट क्रिकेटमध्ये टी 20 सारखे शॉट खेळत बेन डकेट आणि झॅक क्रॉलीने धुव्वा उडवला. मात्र या दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीपला त्यांना थांबवण्यात यश आलं. त्याने बेन डकेटच्या रूपात इंग्लंडची पहिली विकेट घेतली, यावेळी त्यानं डकेटला जसा सेंडऑफ दिला त्याची चर्चा सुरु आहे. 

नेमकं काय घडलं? 

आकाश दीपने 13 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर फलंदाज बेन डकेटची विकेट घेतली. डकेट 43 धावांवर बाद झाला. डकेट रिवर्स स्कूप मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. बॉल त्याच्या बॅटच्या किनाऱ्याला लागून ध्रुव जुरेलच्या जवळ पोहोचली. याविकेटमुळे बेन डकेट आणि झॅक क्रॉलीची पार्टनरशिप 100 धावांच्या आधी तुटली. यावेळी बेन डकेट मैदानातून बाहेर पडत होता. तेव्हा आकाश दीप त्याच्या जवळ गेला आणि त्याने डकेटच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याचा सेंड ऑफ दिला. दोघे काहीतरी बोलत होते आणि आकाशच्या चेहऱ्यावर हसू होतं. तितक्यात मागे उभ्या असलेल्या केएल राहुलने आकाश दीपला थांबवलं आणि डकेट मैदानाबाहेर गेला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  

मायकल एथरटनने केली टीका : 

माजी क्रिकेटर मायकल एथरटन आणि दिनेश कार्तिक दोघे कॉमेंट्री करत होते. तेव्हा मायकल एथरटनला त्याचं हे सेलिब्रेशन आवडलं नाही. मायकल एथरटनने आकाशला सल्ला देत म्हटले की, 'त्याच्या अशा वागणुकीमुळे त्याने डकेटला नाराज केलं. जे गरजेचं नव्हतं. हीच ती विकेट होती ज्याची भारत वाट पाहत होता'. एथरटनने दिनेश कार्तिकला विचारलं, 'तुझी विकेट गेल्यावर कितीवेळा कोणत्या गोलंदाजाने तुझ्या अशा प्रकारे खांद्यावर हात ठेवलाय आणि असा सेंडऑफ दिलाय'.

हेही वाचा : जसप्रीत बुमराह आशिया कप 2026 मधून बाहेर? टीम इंडियाला धक्का, फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह

 

पाहा व्हिडीओ : 

आयसीसी करणार कारवाई? 

आकाश दीपचं सेलिब्रेशन हे आक्रमक नव्हतं आणि डकेट सोबत त्याने केलेला संपर्क हा जबरदस्ती सारखा दिसत नव्हता. पण कोणत्याही प्रकारचा अनुचित संपर्क हे उल्लंघन मानलं जातं. डकेट पूर्णवेळ शांत होता आणि मैदानाच्या बाहेर गेला. आकाश दीपच्या या सेलिब्रेशनचं त्याने काहीच उत्तर दिलं नाही. दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं पण दोघेही आक्रमक दिसले नाहीत. आता हे पाहणं महत्वाचं आहे की मॅच रेफरीने हा प्रकार कसा घेतलाय. आतापर्यंत आयसीसीकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Read More