IND VS ENG Test : भारताने इंग्लंड टेस्टमध्ये रोमांचक विजय मिळवला. भारताच्या हैदराबादमधील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने या सामन्यात 9 विकेट घेतल्या. इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर असताना मोहम्मद सिराजनेच भारताला इंग्लंडची शेवटची विकेट मिळवून दिली. मोहम्मद सिराज हा मूळचा हैदराबादमधील राहणार आहे. तेव्हा मोहम्मद सिराजने टीम इंडियासाठी (Team India) दिलेल्या या योगदानाचं हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी हैदराबादी अंदाजात कौतुक केलं. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला.
हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी एक्सवर पोस्ट करून लिहिले की, 'मोहम्मद सिराज नेहमीच विजेता. जसं आम्ही हैदराबादी म्हणतो, 'पूरा खोल दिये पाशा!''. ओवैसी यांनी यापूर्वी सुद्धा मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे. ते नेहमीच त्याचे प्रशंसक राहिलेत. या टेस्ट सीरिजमध्ये मोहम्मद सिराजने एकूण २३ विकेट घेतले. त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार सुद्धा मिळाला. ३१ वर्षांच्या मोहम्मद सिराजची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याने अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत क्रिकेटचं ट्रेनिंग घेतलं आणि आता तो भारतासाठी खेळतोय.
Asaduddin Owaisi (asadowaisi) August 4, 2025
टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 396 धावांवर ऑल आउट झाली. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचं टार्गेट मिळालं होतं. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी करायला सुरुवात केली. पण दिवस संपल्याने सामना थांबवण्यात आला होता. ओव्हल टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 4 विकेट तर इंग्लंडला 35 धावांची आवश्यकता होती. विजय अशक्य वाटतं असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ऑल आउट केले. त्यामुळे भारताने 6 धावांनी सामना जिंकला.
मोहम्मद सिराजने टेस्ट सीरिजमध्ये किती विकेट घेतल्या?
मोहम्मद सिराजने पाच सामन्यांच्या या टेस्ट सीरिजमध्ये एकूण 23 विकेट घेतल्या, ज्यामुळे तो सीरिजमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याला 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार मिळाला.
अंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा निकाल काय झाला?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी 2-2 ने बरोबरीत संपली.
मोहम्मद सिराजला कोणता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
मोहम्मद सिराजने पाचव्या टेस्ट सामन्यात एकूण 23 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार मिळाला.