IND VS ENG 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. 31 जुलै पासून लंडनच्या ओव्हल मैदानावर शेवटचा टेस्ट सामना खेळवला जात असून पहिल्या दिवशी इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी पहिल्या दिवसाअंती भारतीय संघाच्या 204 धावांवर 6 विकेट घेतल्या. परंतू यादरम्यान इंग्लंड संघाच्या एका स्टार खेळाडूला दुखापत झाली होती. शुक्रवारी इंग्लंड संघासाठी एक मोठी बातमी समोर आली असून त्यांचा एक खेळाडू आता शेवटच्या टेस्ट सामन्यातून बाहेर पडला आहे.
इंग्लंडच्या संघाला पाचव्या टेस्टमध्ये मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज क्रिस वोक्स पाचव्या टेस्टच्या पहिल्या दिवशी दुखापतीच्या कारणामुळे मैदानाच्या बाहेर पडला होता. मैदानात तो खांद्यावर विचित्र प्रकारे पडला त्यानंतर तो खूप वेदनेत दिसला आणि त्याला बाहेर नेण्यात आलं. क्रिस वोक्सच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याला होत असलेल्या वेदना स्पष्ट जाणवत होत्या. आता इंग्लंड क्रिकेटने स्पष्ट केलं की वेगवान गोलंदाज क्रिस वोक्स हा शेवटच्या टेस्ट सामन्यातून दुखापतीच्या कारणामुळे बाहेर पडला आहे. क्रिस वोक्सने पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलची विकेट घेतली होती.
क्रिस वोक्सच्या दुखापतीने इंग्लंड संघाला अजूनच संकटात टाकलं आहे. इंग्लंड संघात त्यांचे 4 मुख्य खेळाडू सध्या खेळत नाहीयेत. कर्णधार बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स यापूर्वीच शेवटच्या टेस्ट सामन्यातून बाहेर पडले होते. आता इंग्लंडकडे गोलंदाजीची केवळ गस एटकिंसन, जोश टंग, जेमी ओवरटन, पार्ट टाइम स्पिनर जो रूट आणि जैकब बेथेल शिल्लक आहेत.
A further assessment will take place at the end of the series pic.twitter.com/9mzGbV5WSL
England Cricket (englandcricket) August 1, 2025
पाचव्या टेस्टसाठी भारताची प्लेईंग 11 कशी आहे?
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज
पाचव्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेईंग 11 कशी आहे?
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग
भारताने ओव्हल मैदानावर आतापर्यंत किती सामने जिंकेल?
ओव्हल मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 15 टेस्ट सामने खेळले आहेत. यापैकी केवळ दोन सामने टीम इंडियाने जिंकलेत.