IND VS ENG 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील 5 वा सामना हा लंडन शहरातील ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमधील आतापर्यंत भारताने 1 तर इंग्लंडने 2 सामने जिंकले, तसेच एक टेस्ट सामना हा ड्रॉ झाला. आता दोन्ही संघांसाठी शेवटचा सामना अत्यंत महत्वाचा असणार असून भारताला काहीही करून हा सामना जिंकून सीरिज 2-2 ने ड्रॉ करावा लागेल. अन्यथा इंग्लंड ही सीरिज जिंकेल. मात्र या सामन्यादरम्यान पाऊस व्हिलन ठरण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये पाचवा सामना हा 31 जुलै रोजी ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार येथे होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या दिवशी आकाशात ढग असतील आणि हलका पाऊस पडू शकतो. पहिल्या दिवशी पावसाची 20 टक्के शक्यता आहे. अशात सुरुवातीच्या सेशनमध्ये वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त स्विंग आणि सीम मूवमेंट पाहायला मिळतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हवामान स्वच्छ असेल, यावेळी तापमान हे 22 ते 25 डिग्री सेल्सियसच्यामध्ये असेल. चौथ्या दिवशी सुद्धा हवामान सामान्य असेल. पण पाचव्या दिवशी पुन्हा एकदा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सामन्याच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो.
पहिल्या दिवसाचे हवामान पाहिल्यास टॉस जिंकणारा संघ गोलंदाजीचा पर्याय निवडू शकतो. ओव्हल खेळपट्टीवरील पहिल्या दिवशीचं हवामान पाहता टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणं फायदेशीर ठरू शकेल. कारण सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळू शकते. नंतरच्या दोन दिवसांत फलंदाजी सुलभ होईल, परंतु शेवटच्या दिवशी हवामानाचा मूड पुन्हा बदलू शकेल.
ओव्हल मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 15 टेस्ट सामने खेळले आहेत. यापैकी केवळ दोन सामने टीम इंडियाने जिंकलेत. तर 6 सामन्यात भारताचा पराभव झाला असून सात सामने ड्रॉ झाले आहेत. 2021 नंतर भारताने या मैदानावर एकही टेस्ट सामना खेळलेला नाही. भारताने मागील 10 टेस्ट सामन्यांपैकी फक्त एक सामना येथे जिंकला. टीम इंडियाने केनिंग्टन ओव्हलमध्ये पहिला टेस्ट सामना हा ऑगस्ट 1936 मध्ये खेळला होता.
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जायसवाल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, आकाश दीप, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.